संत्र्याच्या सालींनी मिळवा निसर्गसंपन्न सौंदर्य: साबणाची गरजच नाही!

07 Aug 2025 14:06:25
Orange peel benefits for skin आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्वजण संत्रं खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानतो. संत्र्यामध्ये असलेलं व्हिटॅमिन C शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूपच उपयुक्त आहे. मात्र, आपण संत्रं खाल्ल्यानंतर त्याची साल डस्टबिनमध्ये टाकतो – आणि हीच सवय आपल्याला सौंदर्यदृष्ट्या अनेक फायदे मिळवण्यापासून वंचित ठेवते.
 
 
Orange peel benefits for skin
संत्र्याच्या सालींचं महत्त्व Orange peel benefits for skin 
संत्र्याच्या सालींमध्ये केवळ व्हिटॅमिन C नव्हे, तर भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सही असतात, जे त्वचेचा रंग उजळवतात, मुरुमं कमी करतात, त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि टॅनिंगही घालवतात.बहुतांश लोक त्वचेला स्वच्छ करण्यासाठी साबण वापरतात, पण अनेक वेळा हे साबण त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. म्हणूनच, घरच्या घरी बनवलेला आणि संत्र्याच्या सालींपासून तयार केलेला हा स्क्रब त्वचेसाठी उत्तम पर्याय ठरतो.
 
 
स्क्रबसाठी लागणाऱ्या गोष्टी:
 
संत्र्याच्या वाळवलेल्या साली
बेसन
हळद
मध
पाणी
कसा तयार कराल हे स्क्रब:
१. संत्र्याच्या साली चांगल्या प्रकारे धुऊन ४-५ दिवस उन्हात वाळवा.
२. त्या साली सुकल्यानंतर मिक्सरमध्ये भरडसर वाटून पावडर तयार करा.
३. यामध्ये समान प्रमाणात बेसन आणि थोडीशी हळद मिसळा.
४. या मिश्रणात मध आणि पाणी घालून पेस्ट तयार करा.
 
 
कसा वापराल:
हा स्क्रब रोज अंघोळीच्या वेळी साबणाऐवजी वापरा.
थोडं पेस्ट घ्या आणि त्वचेवर सौम्यपणे मसाज करा.
२-३ मिनिटांनी पाणी टाकून स्वच्छ धुवा.
 
 
फायदे:
त्वचेला मिळते नॅचरल ग्लो
मुरुमं आणि डाग दूर होण्यास मदत
त्वचेला सौम्य स्क्रबिंग मिळते
केमिकल फ्री पर्याय
टॅनिंग कमी होतं आणि रंग उजळतो
ही घरगुती पद्धत नैसर्गिक आणि खर्चिक साबणांपेक्षा सुरक्षित आहे. रोजच्या दिनचर्येत वापरल्यास त्वचेमध्ये लक्षणीय बदल दिसून येतो. त्वचेला सुंदर, नितळ आणि निरोगी बनवण्यासाठी ही नैसर्गिक पद्धत नक्की वापरून पाहा!
Powered By Sangraha 9.0