विचित्र अपघातात पाच जखमी

07 Aug 2025 21:12:33
पुलगाव, 
accident-news : पुलगाव येथून वर्धेच्या दिशेने भरधाव येणार्‍या व्हॅगन आर कार चालकाने प्रथम दुचाकीला आणि नंतर विरुद्ध दिशेने येणार्‍या कारला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नी आणि कारमधील तिघे जखमी झाले. जखमींना तत्काळ सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी व्हॅगन आर कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना बोदड गावासमोर कुलझडी फोड फाट्यासमोर ५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
 
 
 
jhkj
 
 
 
चंद्रशेखर बेले (३७), दुर्गा बेले (३२) दोघेही रा. हरिरामनगर पुलगाव, किशोर बडगे (४९) रा. देवरादेवरी नांदगाव पेठ ता. जि. अमरावती, राहुल हांडे (३९) रा. वडगाव (राजदी) ता. धामनगाव जि. अमरावती आणि अंकीत खाकरे (३२) रा. हातरून ता. बाळापूर जि. अकोला अशी जखमींची नावे आहेत.
 
 
मिळालेल्या माहितीनुसारण चंद्रशेखर बेले हे पत्नी दुर्गा हिच्यासोबत एम. एच. ३२ आर. ४६२४ क्रमांकाच्या दुचाकीने निमगाव येथून पुलगावला परत येत होते. तर एम. एच. ३२ ए. एच. ८५३५ क्रमांकाची कार पुलगाववरून वर्धेच्या दिशेने जात होती. दरम्यान, कुरझडी येथे बेले यांच्या दुचाकीला व्हॅनग आर.ची धडक झाला. यात चंद्रशेखर आणि दुर्गा हे पती-पत्नी जखमी झाले. किशोर बडगे, राहुल हांडे आणि अंकित खाकरे हे वर्धेवरून एम. एच. ३२ ए. एस. ५७९७ क्रमांकाच्या कारने अमरावतीकडे जात असताना व्हॅगर आर कार चालकाने त्यांच्याही कारला जबर धडक दिली.
 
 
यात कारमधील तिघेही जखमी झाले. हा विचित्र अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सावंगी रुग्णालयात हलविले आणि अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत जखमींचे बयाण नोंदविले. व्हॅगन आर कार चालकाचे नाव प्रदीप वंजारी रा. पिपरी मेघे, वर्धा असे असून तो दारू पिऊन वाहन चालवित असल्याचा संशय जखमींनी व्यत केला. जखमींच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी प्रदीप वंजारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत प्रकरण तपासावर घेतले आहे.
Powered By Sangraha 9.0