Sydney Sweeney अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनीच्या 'अमेरिकन ईगल' या क्लोदिंग ब्रँडसाठी केलेल्या डेनिम अॅडवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली असतानाच, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या अॅडचं कौतुक केलं आहे.
एका रिपोर्टरशी बोलताना ट्रम्प यांनी सिडनी स्वीनीचा उल्लेख करत म्हटलं, "जर सिडनी स्वीनी रजिस्टर्ड रिपब्लिकन असतील, तर मला वाटतं की त्यांचा अॅड अप्रतिम आहे." त्यांच्या या वक्तव्यानंतर सिडनीच्या राजकीय भूमिकेवर आणि तिच्या अलीकडील अॅडवर वाद सुरू झाले आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा अॅड 'Genes आणि Jeans' या शब्दांवर भाष्य करत आहे. त्यामध्ये कौटुंबिक मूल्यं, परंपरा आणि डेनिम स्टाईल एकत्र मांडली गेली आहे. काही जणांनी याला रिपब्लिकन विचारधारेचा प्रचार मानलं असून, काहींनी यावर मुक्त अभिव्यक्ती म्हणून समर्थन केलं आहे.
Sydney Sweeney सिडनी स्वीनीने १४ जून २०२४ रोजी फ्लोरिडामध्ये स्वतःला रिपब्लिकन म्हणून नोंदवलं. त्याआधी तिने फ्लोरिडामध्ये एक आलिशान विला खरेदी केला होता. त्यामुळे तिच्या अॅड आणि राजकीय विचारसरणी यांचं कनेक्शन चर्चेत आलं.सिडनी बर्निस स्वीनीचा जन्म १२ सप्टेंबर १९९७ रोजी वॉशिंग्टनमध्ये झाला. तिची आई क्रिमिनल डिफेन्स लॉयर होती आणि वडील वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. तिला एक भाऊ असून तिने स्पोकेन येथील सेंट जॉर्ज स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. ती शालेय काळात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असे.स्वीनीने २००९ साली ‘क्रिमिनल माइंड्स’, ‘ग्रे’ज अॅनाटॉमी’ आणि ‘प्रिटी लिट्ल लायर्स’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये गेस्ट अॅक्टरेस म्हणून काम करून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. आज ती हॉलिवूडमधील आघाडीच्या युवा अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
या संपूर्ण घडामोडींमुळे सिडनी स्वीनीच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबतच तिच्या राजकीय भूमिकेकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.