तभा वृत्तसेवा
राळेगाव,
cowshed-fire : अचानक लागलेल्या आगीत गोठा संपूर्ण जळून खाक झाला असून यात दोन जनावरे भाजून गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील डोंगरगाव येथे गुरुवार, 7 ऑगस्टला घडली. यात शेतीविषयक साहित्य जळाल्याने शेतकèयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी लक्ष्मण रामभाऊ उरकुडे यांच्या शेतातील गोठ्याला रात्री अचानक आग लावली. गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून आगीच्या झळा बसताच गोठ्यातील बैल दावे तोडून सैरावैरा पळू लागले. मात्र आगीच्या झळांमुळे दोन्ही बैल भाजून गंभीर जखमी झाले आहे.
तर गोठ्यातील पाईप 30, नोझल 14, पंप 4, खत 50 बॅग, युरिया 10 बॅग, कीटकनाशक औषध हे संपूर्ण शेती उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकरी लक्ष्मण उरकुडे यांचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सकाळी घटनेची माहिती शेतकèयांनी संबंधित तलाठ्याला दिली. मात्र घटना घडून पूर्ण दिवस गेला. तरीपण तलाठ्याने घटनास्थळाला भेट दिली नाही. फक्त फोनवर माहिती विचारून मी पंचनामा करीत असल्याचे सांगितले. यावरून शेतकèयाने तलाठ्यावर नाराजी व्यक्त केली असून, या तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकèयांमधून होत आहे.