तीन मित्रांनी 15 लाख रुपयांनी केली मित्राचीच फसवणूक

07 Aug 2025 21:54:23
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
yavatmal-news : फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये गंडवणाèया टोळक्यांनी आता दुप्पट पैसे देण्याच्या नावाखाली भोंदूगिरीचा नवा फॉर्म्युला शोधून काढला आहे. शांतीनगर, मुळावा येथील 21 वर्षीय युवकास पैसे दुप्पट करतो असे आमिष दाखवून तब्बल पंधरा लाखांची फसवणूक केली.
 
 
 
hjkh
 
 
 
फसवणूक करणाèया तिघांना पोफाळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पिंपळदरी येथील बंडू दिगंबर ढाकरे, बिबी येथील गोपाळ हनुमान कुरकुटे आणि पिंपळदरी येथील किसन गोविंद आढाव या तिघांविरुद्ध पोफाळी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
24 जून 2024 रोजी कपिलने तेलंगणातून 13 लाख रुपये किंमतीचे हार्वेस्टर विकत घेतले होते. मात्र उत्पन्नाऐवजी कर्जाचा बोजा वाढत गेला. शेती नसल्याने बँकेकडून कर्ज देण्यास नकार मिळाल्यावर तो आपला मित्र बंडू ढाकरे याच्याकडे मदत मागण्यासाठी गेला.
 
 
बंडूने सुरुवातीला 20 हजार व नंतर 10 हजार रुपये रोख दिले आणि विश्वास संपादन केला. पुढे बंडूने कपिलला सांगितले, माझ्याकडे एक माणूस आहे, जो पैसे दुप्पट करतो. तुझ्याकडील हार्वेस्टर विकून त्याला पैसे दे पैसे दुप्पट आल्यावर महिन्याभरात दुसरे नवीन वाहन घे. बंदूने विश्वासात घेतल्याने कपिलने आपले हार्वेस्टर रेणुराव मार्केड यांना 12 लाख रुपयात विकले. त्यातून मिळालेले 10 लाख घेऊन तो आरोपी बंडूच्या सल्ल्याने पिंपरी येथे पोहोचला अन् तेथेच त्याला गंडविण्यात आले.
 
 
तिथे कपिलला गोपाळ नामक इसमाने भेट दिली. दोघे मिळून पाचशेच्या नोटा केमिकलने दुप्पट करतात, असा ‘डेमो’ दाखवण्यात आला. यात कपिलचा विश्वास अधिकच वाढला. मग कपिलने आपल्या जवळील 10 लाख रुपये त्याच प्रकारे केमिकल, कागद व टाकीच्या प्रयोगासाठी दिले. या टाकीत पैसे टाकून, त्यावर केमिकल ओतून तीन दिवसांनी स्फोट होऊ नये, म्हणून सावध राहा असे सांगितलं आणि कपिल व त्याच्या पत्नीला घराबाहेर काढून संधी साधून सर्वजण गायब झाले. काही दिवसांनी दोन लाख रुपये परत करून उरलेले आठ लाख रुपयांची फसवणूक केली .
ठाणेदारांची तत्परता : आरोपी गजाआड !
 
 
फसवणुकीची कल्पकता, गुंतागुंत आणि आरोपींची धूर्तता पाहता, पोलिसांनी गंभीर दखल घेतली. कपिल गायकवाड यांच्या तक्रारीवरून पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती ठाणेदार पंकज दाभाडे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0