दुचाकी चोरट्यांच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या

07 Aug 2025 21:47:50
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-news : गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडी व दुचाकीचे चोरी प्रमाण वाढले होते. यावर लोहारा पोलिसांनी अंकुश लावले असून, बुधवार,6 ऑगस्ट रोजी तब्बल 16 चोरलेल्या दुचाकीसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे नागरिकांतून लोहारा पोलिसांचे कौतूक करण्यात येत आहे.
 
 

y7Aug-Lohara 
 
 
 
लोहारा पोलिस पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयितांना वाघापूर परिसरात एक बिना नंबरची स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन फिरत असताना ताब्यात घेण्यात आले. त्यांची सखोल चौकशी केली असता मोटारसायकल चोरी गेलेली असल्याचे सांगीतले.
 
 
आरोपी नीलेेश मुनेश्वर (32), रा. सालोंड, ह.मु. उमरसरा, यवतमाळ गणेश विलास उले (20), रा. सालोंड, ता. घाटंजी, आदित्य राऊत ( 20), रा. वडगाव, यवतमाळ यांना अटक करण्यात आली. या आरोपींची चौकशी करुन त्यांच्याकडून एकूण 16 मोटारसायकलींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत अंदाजे 15,30,000 आहे. चोरी केलेल्या मोटारसायकली विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
 
आरोपींवर कलम 124 महाराष्ट्र पोलिस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता,अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी, गजानन अजमीरे, संतोष आत्राम, बबलु पठाण, प्रशांत राठोड, नकुल रोडे, पवन चिरडे, उमेश प्रधान, कल्पेश रामटेके, अतुल चौहाण यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0