राज्यातील दीडशेवर पाेलिस निरीक्षकांना पदाेन्नती

अखेर प्रतीक्षा संपली : लवकरच सहायक पाेलिस आयुक्तापदावर हाेणार रुजू

    दिनांक :08-Aug-2025
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
Maharashtra Police Inspector राज्यभरातील 215 वरिष्ठ पाेलिस निरीक्षकांना सहाय्यक पाेलिस आयुक्तपदावर पदाेन्नती देण्यासाठी संवर्ग मागवून जवळपास 4 महिने झाले हाेते. मात्र, पदाेन्नतीची प्रक्रिया रखडल्याने अनेक अधिकारी पदाेन्नतीच्या प्रतीक्षेत हाेते.अखेर गृहमंत्रालयाने सकारात्मकता दाखवत गुरुवारी राज्य पाेलिस दलातील 156 पाेलिस निरीक्षकांना सहायक पाेलिस आयुक्त पदावर पदाेन्नतीची यादी जाहीर केली. गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे अनेक अधिकाèयांच्या चेहèयावर आनंद आहे.
 

Maharashtra Police Inspector  
गेल्या 27 मे राेजी पाेलिस महासंचालक कार्यालयाने 215 पाेलिस निरीक्षकांच्या पदाेन्नतीची पात्रता यादी प्रकाशित केली. संवर्ग मागितल्यानंतर जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पाेलिस निरीक्षकांना सहायक पाेलिस आयुक्तपदावर पदाेन्नती देण्यात येत नव्हती. मात्र, काही पाेलिस निरीक्षक वयाेमानाने सेवानिवृत्त हाेत असल्यामुळे घाईगडबडीत काही पाेलिस निरीक्षकांना सहायक पाेलिस आयुक्तपदावर पदाेन्नती देण्यात आली. मात्र, त्या अधिकाèयांच्या नशिबी केवळ तीन दिवसांचाच कार्यकाळ आला. त्यामुळे पाेलिस अधिकाèयांनी नाराजी व्यक्त केली. उपलब्ध प्रभारी अधिकाèयांवर असलेला अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी रिक्त असलेल्या पदांवर सहायक आयुक्तांची आवश्यकता असल्याने जवळपास अडीचशेवर पाेलिस अधिकारी पदाेन्नतीची प्रतीक्षा करीत हाेते. अखेर गुरुवारी सायंकाळी पाेलिस निरीक्षकांच्या पदाेन्नतीची यादी जाहीर झाली. यामध्ये 156 पाेलिस निरीक्षकांना सहायक आयुक्त पदावर पदाेन्नती देण्यात आली. गृहमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे अधिकाèयांना आनंद झाला आहे. पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये नागपुरातील सदरचे ठाणेदार महेश ठाकरे, आयुक्तालयातील प्रशासनचे कुरुडकर, ग्रामीणचे अधिकारी किशाेर नगराळे, एसीबी वैशाली वैरागडे यांचा समावेश आहे.
 
 
‘साईट पाेस्टिंग’ला काढलेत दिवस
सहायक पाेलिस आयुक्त पदासाठी महसुली संवर्ग दिल्यामुळे पदाेन्नती हाेणार म्हणून राज्यातील अनेक वरिष्ठ निरीक्षक चार महिन्यांपासून ’साइड पाेस्टिंग’ वर कार्यरत हाेते. पदाेन्नतीने बदली झाल्यानंतर ‘अपेक्षित’ बदलीसाठी अनेकांनी ‘सेटींग’ लावली हाेती. त्यानुसार अनेक अधिकाèयांनी ‘मलाईदार’ ठिकाणी नियुक्ती मिळवली आहे, अशी चर्चा आहे.