वेध..
birds-human-food भूतदया पाळली पाहिजे, असे आपल्या संस्कृतीमध्ये म्हटले आहे. याचा विचार केला तर प्राणिमात्रांवर दया केलीच पाहिजे. म्हणजे त्यांना विनाकारण मारू नये. शिकार करू नये. प्राण्यांचा छळ होईल, अशी वागणूक देऊ नये. हे सर्व म्हणजे भूतदयाच आहे. पण, आपण याचा वेगळा अर्थ लावून एकप्रकारे प्राणी आणि मानव या दोघांच्याही आरोग्याला अपायकारक असे कृत्य करतो. सुट्यांमध्ये आपण काही लोक जंगल सफारीला जातो. जंगलात असलेल्या विविध प्राण्यांना आपल्याकडील अन्नपदार्थ खायला घालतात. वास्तविक जंगलात किंवा अभयारण्यात वन्यजीव संरक्षण विभागाने ठिकठिकाणी जंगलातील प्राण्यांना आपल्याकडील अन्नपदार्थ खायला घालू नये, अशा सूचना असलेले फलक लावलेले असतात. तरीही आपण आपल्या मुलांना गंमत वाटावी म्हणून माकड किंवा पक्ष्यांना आपल्याकडील अन्नपदार्थ खायला देतो. तसेच, अभयारण्याच्या प्रवेशद्वारावरच आपल्याकडील अन्नपदार्थ काढून ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. तरीही काही जण ते लपवून जंगलात आपल्या सोबत नेतात. ते नेण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. त्यातील पदार्थ संपल्यावर त्या पिशव्या जंगलातच टाकून दिल्या जातात.
त्या पिशव्यांना अन्नाचा वास लागलेला असतो. त्यामुळे अनेकदा जंगली प्राणी त्या पिशव्या खातात. त्यामुळे अनेकदा त्यांचा मृत्यू होतो. प्राण्यांना खाऊ घालणे. त्यांच्यासाठी घराच्या परसबागेत किंवा वèहांड्यात पाण्याची व्यवस्था करणे यामागची भावना चांगली आहे. उन्हाळ्यात अनेक संस्था-संघटना पक्ष्यांसाठी बर्ड फिडिंग किंवा पाणी पात्राचे वितरण करतात. पशुपक्षी वाचावे, हा त्यामागचा त्यांचा उदात्त उद्देश असतो. कारण पक्ष्यांचे खाद्य मुख्यत: कृमी, कीटक, अळ्या हेच असते. पक्षी वाचले तर या कीटकांपासून पिकांचे होणारे नुकसान टाळता येते. पक्षी शेतातील कृमी-कीटक खातात. शेती आणि शेतकèयांसाठी ते लाभदायकच ठरते. सकाळी घराच्या अंगणात आपण ठेवलेल्या पाणीपात्र आणि धान्य खाण्यासाठी पक्षी जमल्यामुळे त्यांचा किलबिलाट कानाला आल्हाददायक वाटतो. त्यामुळे मन प्रसन्न होते. सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण, काही पक्ष्यांपासून मानवाला गंभीर आजार जडण्याची शक्यता देखील असते. आपल्या घराच्या भोवती कबूतर जास्त संख्येत वास्तव्य करीत असतील तर त्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता असते. कारण, त्यांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा भुगा (पावडर) हवेत पसरते. त्यामुळे मनुष्याला श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता असते. कुत्र्यांपासूनही मानवाला अपाय होऊ शकतो. कुत्रा इमानदार प्राणी असल्याने आपण त्यांना पाळतो. पण, कुत्र्यांपासून रेबीज हा आजार होण्याची शक्यता असते. लेप्टोस्पायरोसिस हा आजार कुत्र्यांच्या मूत्रातून पसरणाèया जीवाणूंमुळे होतो. खरुज हा त्वचारोग होऊ शकतो. खामगावात तीन महिन्यात भटक्या कुत्र्यांनी 58 जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला जन्म देताना त्याचे अन्नदेखील निर्माण केले आहे. वन्यप्राण्यांना आपण खातो ते धान्य किंवा अन्नपदार्थ खाऊ घालण्याची गरज नसते. माणसाने जास्त जेवण केले की अजीर्ण होते. त्यामुळे पोटाचे विकार जडतात. त्याचप्रमाणे पक्ष्यांना एकच धान्य खाऊ घातले तर त्यांनादेखील ते पचत नाही. खरे म्हणजे आपण खातो ते धान्य त्यांना केवळ 10 ते 20 टक्केच हवे असते. त्यांचे खाद्य ते स्वत:च शोधतात. कृमी-कीटक खाऊन ते जगतात. त्यांना जर आयते खाद्य मिळू लागले तर त्यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होईल.birds-human-food आज जंगलात किंवा शेतशिवारात हरणांचे कळप, माकडांच्या टोळ्या दिसतात. हरणाचा कळप एखाद्या शेतात घुसला की पिकांचे नवीन कोंब फस्त करतात. त्यामुळे शेतकèयांचे मोठे नुकसान होते. परंतु, शेतात बाराही महिने पीक नसते. त्यामुळे त्यांना त्यांचे अन्न शोधावे लागते. आपण त्यांना जर खाऊ घातले तर त्यांचे आयुष्यमान वाढून त्यांची संख्या भरमसाट वाढेल. मानवाला त्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
एकंदर विचार केला तर प्राणी, पशू, पक्षी हे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे त्यांचे रक्षण आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्यापासून मानवालादेखील अपाय होऊ शकतो. मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. याचाही विचार आपण केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात भूतदया असलीच पाहिजे.birds-human-food मुक्या प्राण्यांचा कोणी छळ करीत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. वन्यप्राण्यांची शिकार करू नये आणि कोणालाच करू देऊ नये. पिसाळलेला कुत्रा, नरभक्षी वाघाचा बंदोबस्त केलाच पाहिजे. प्राणिमात्रांवर दया करताना ते आपल्या जिवावर उठणार नाहीत आणि आपल्यापासूनही त्यांच्या जिवाला धोका पोहोचणार नाही, याचे तारतम्य राखून प्रत्येकाने भूतदया अंगीकारावी.
विजय कुळकर्णी
8806006149