दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये भीषण आग, एकाचा मृत्यू

09 Aug 2025 15:51:11
दिल्ली
KOSMOS Hospital रक्षाबंधनच्या दिवशी दिल्लीतील आनंद विहार परिसरात असलेल्या KOSMOS हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये अचानक आग लागली आणि त्यामुळे संपूर्ण इमारतीत धुराचा मोठा फैलाव झाला. आग लागल्यानंतर हॉस्पिटलमधील काही ऑक्सिजन सिलेंडरही धोक्याच्या झोनमध्ये आले होते. मात्र दिल्ली फायर ब्रिगेडच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
 

KOSMOS Hospital fire incident 
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच तात्काळ तीन फायर टेंडर घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये धुराचं प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांना बाहेर काढण्यासाठी खिडक्यांची काच फोडण्यात आली. काही रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून काहींना नजीकच्या पुष्पांजली हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.या घटनेत हॉस्पिटलमधील अमित नावाच्या एका हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर त्याने स्वतःला स्टोअररूममध्ये बंद केलं होतं, मात्र धुरामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेत चार जण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले असून, ते रुग्ण होते की नातेवाईक, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
 
स्थानिक KOSMOS Hospital नागरिकांनी सांगितलं की शॉर्ट सर्किटनंतर दोन ते तीन ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याचं त्यांनी पाहिलं. पण सुदैवाने, उर्वरित सिलेंडर वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे संभाव्य मोठा स्फोट टळला. फायर ब्रिगेड आणि हॉस्पिटल स्टाफच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले.सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि संबंधित यंत्रणांकडून सुरक्षा उपाययोजनांबाबत पुनरावलोकन केलं जात आहे.
Powered By Sangraha 9.0