अनिल कांबळे
नागपूर,
Ritu Malu मद्यधुंद अवस्थेत रितू मालूने भरधाव कार चालवून दाेन तरूणांचा बळी घेतल्याप्रकरणातील पुरावे नष्ट करण्यास मदत केल्यामुळे सत्र न्यायाधीश ए.ए.अंसारी यांनी पाेलिस निरीक्षकांसह सात कथित आराेपींविरूध्द पुन्हा नव्याने चाैकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिले.तहसील पाेलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार संदीप बुवा, पाेलिस उपनिरीक्षक परशूराम भवाड, रितूचा पती दिनेश मालू, माधुरी सारडा, माधुरीचा पती शिशीर सारडा यांच्या नावाचा समावेश अर्जात आहे. याप्रकरणात आराेपी म्हणून घटनेच्या दिवशी सहभागी दाेन अज्ञात तरूणांचाही समावेश आहे.
अॅड. अमाेल हुंगे यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा संशयास्पद आणि वरवर तपास झाल्यामुळे या प्रकरणाचा तपास नव्याने करण्यात यावा, यासाठी िफर्यादी शाहरूख झिया माेहम्मद आणि इफफ्तेखार निसार अहमद यांनी सत्र न्यायालयात ाैजदारी पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या.अंसारी यांनी प्रथम दर्शनी आराेपींविरूध्द प्रकरण दिसून येत असल्यामुळे सात कथित आराेपींना समन्स पाठवून चाैकशीचे आदेश दिले. मुख्य आराेपींना मदत करणे व पुरावे नष्ट करणे यात काही पाेलिस अधिकारी आणि इतर व्यक्तींचा सहभाग असल्याचा गंभीर आराेप करत त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी तपास निर्देशित करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली हाेती. िफर्यादीर्ते अॅड. अमाेल हुंगे यांनी बाजू मांडली.
असे आहेत आराेप
25 ेब्रुवारी 2024 राेजी मध्यरात्री दीडच्या सुमारास रामझुला पुलावर हा अपघात झाला हाेता. रितू मालूने मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे मर्सिडीज कार चालवून दुचाकीला धडक दिली. यात माेहम्मद हुसेन गुलाम उमर व माेहम्मद आतिफ माेहम्मद झिया उमर या दाेन तरुणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रितू व माधुरी यांना पीएसआय पुरुषाेत्तम भवाळ यांनी ताब्यात न घेता लगेच साेडून दिले हाेते. पती दिनेश आणि शिशिर यांनी पाेलिसांशी संगनमत करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हाेता. पीएसआय पुरुषाेत्तम भवाळ यांनी आराेपींना पळून जाण्यास व कारमधील दारूच्या बाटल्यांसारखे पुरावे नष्ट करण्यास मदत केली, असा गंभीर आराेप आहे. संदीप बुवा यांनी जप्त मर्सिडीज काेणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय आराेपीच्या कुटुंबीयांना परत केली.
तपासात दिरंगाई
प्रकरणाचा तपास तहसील पाेलिसांकडून काढून सीआयडीकडे साेपवण्यात आल्यानंतरही पाेलिस अधिकारी व इतर संशयितांच्या भूमिकेची चाैकशी झाली नाही. याचिकाकर्त्यांनी अधिकाèयांकडे वारंवार तक्रारी करूनही काेणतीही कारवाई झाली नाही. यापूर्वी याचिकाकर्त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी काेर्टात अर्ज दाखल करून या प्रकरणात इतर आराेपींविरुद्ध तपासाची मागणी केली हाेती. मात्र, 11 ेब्रुवारी 2025 राेजी काेर्टाने ताे अर्ज नाकारला. या निर्णयाविरूध्द याचिकाकर्त्यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करून संदीप बुवा, परशुराम भवाळ, तसेच माधुरी , दिनेश , शिशिर आणि इतर दाेन अज्ञात व्यक्तींच्या भूमिकेची चाैकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिलेत.