War 2: ऋतिक- ऋतिक-Jr NTRची अ‍ॅक्शन जोडी 14 ऑगस्टला

    दिनांक :09-Aug-2025
Total Views |
मुंबई,
War 2 box office collection भारतीय चित्रपटसृष्टीतील स्पाय यूनिव्हर्सच्या चित्रपटांनी गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांमध्ये आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. या थीमवर आधारित अनेक चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला नाही, तर प्रेक्षकांचीही मनं जिंकली. त्याच मालिकेत YRF स्पाय यूनिव्हर्सचा पुढचा भाग म्हणून ऋतिक रोशनचा ‘वॉर 2’ 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून सोशल मीडियावरील चर्चांवरून याला दमदार ओपनिंग मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 

War 2 box office collection 
‘वॉर 2’ मध्ये ऋतिक रोशनसोबत साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची जोडी झळकणार असून या जोडीकडून बॉक्स ऑफिसवर कमाल अपेक्षित आहे. त्याआधी आलेल्या बॉलीवूडच्या स्पाय थ्रिलर चित्रपटांच्या ओपनिंग डे कामगिरीवर नजर टाकली, तर शाहरुख खानच्या ‘पठान’ ने 57 कोटींपेक्षा जास्त कमाई करून विक्रमी सुरुवात केली होती आणि भारतात 543.05 कोटींचा गल्ला जमवला. ऋतिक आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ च्या पहिल्या भागाने ओपनिंगला 53.35 कोटी कमावले आणि एकूण 300 कोटींचा टप्पा गाठला.
सलमान खानच्या ‘टायगर 3’ ने पहिल्या दिवशी 44.50 कोटी, तर ‘टायगर जिंदा है’ ने 34.10 कोटी आणि ‘एक था टायगर’ ने सुमारे 33 कोटींची सुरुवात केली होती. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवले. आता ‘वॉर 2’ चे ट्रेलर प्रेक्षकांनी उत्साहाने स्वीकारले असून, 14 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ऋतिक-ज्युनियर एनटीआरची जोडी अ‍ॅक्शनच्या जोरावर प्रेक्षकांना किती मोहवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.