'लव सेक्स और धोखा डार्लिंग'...

    दिनांक :01-Sep-2025
Total Views |
बिहार,
teacher murder दरभंगा जिल्यातील सकतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मधुपूर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व बीएलओ राजेश कुमार ठाकुर (२४) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी शिक्षिका रुक्मणी कुमारी (२५) व तिचा पती अभिलाष कुमार यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांना त्यांच्या बौरवा, बहेरी येथील घरातून पकडले.
 

Darbhanga teacher murder case 
गुरुवारी संध्याकाळी राजेश कुमार ठाकुर आपल्या दुचाकीवरून कनकपूर उत्तरी प्राथमिक शाळेकडे जात असताना संस्कृत शाळेजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दुचाकीवर आलेल्या एका बदमाशाने देशी कट्ट्यातून गोळी झाडली. गोळी थेट राजेश यांच्या पोटात लागली. गंभीर जखमी अवस्थेत स्थानिकांच्या मदतीने त्यांना पंडौल येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर अधिक चांगल्या उपचारासाठी डीएमसीएचला रेफर करण्यात आले. नंतर दरभंगा येथील पारस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
 
मृत राजेश Darbhanga teacher murder case आणि आरोपी रुक्मणी कुमारी यांची ओळख दोन वर्षांपूर्वी एका शाळेत नोकरीदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. रुक्मणी विवाहित असून दोन मुलांची आई आहे, तरी ती राजेशसोबत विवाह करू इच्छित होती. मात्र राजेश तयार नसल्याने त्यांनी मधुबनीजवळच्या शाळेत बदली करून रुक्मणीपासून अंतर ठेवले होते.
 
 
या कारणावरून रुक्मणी व तिच्या पती अभिलाषमध्ये नेहमी वाद व्हायचे. अभिलाषला पत्नीचे राजेशसोबतचे संबंध माहीत होते. हत्या होण्यापूर्वी रुक्मणी व तिचा पती शाळेत आले होते आणि काही वेळातच राजेशवर हल्ला झाला, अशी माहिती समोर आली आहे.एसडीपीओ बेनीपूर यांनी सांगितले की, या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. खुनात सहभागी इतर आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला जाईल.