बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करा

10 Sep 2025 21:58:45
उमरखेड : Banjara community- Dhadak Morcha महाराष्ट्रातील बंजारा जातीला अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारीत सामील करण्याची शिफारस राज्याने केंद्र शासनाकडे करावी तसेच कर्नाटक, आंध्र, तेलंगण राज्याप्रमाणे संविधानिक प्रलंबित न्याय दूर करून सवलती व योजना लागू कराव्या या मागणीसाठी उमरखेड तालुक्यातील गोरसेना व सकल बंजारा समाजाच्या वतीने बुधवार, 10 सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. स्थानिक वसंतराव नाईक चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला यावेळी बंजारा समाजातील महिलांनी पारंपारिक वेशभूषा व वाद्य मोर्चाचे आकर्षण होते.
 
 
Banjara community- Dhadak Morcha
 
Banjara community- Dhadak Morcha महाराष्ट्रातील बंजारा जमातीला जनगणनेत विविध नावाऐवजी ‘गोर बंजारा’ या एकाच नावाने संबोधून लगतच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्य प्रमाणे संविधानिक प्रलंबित न्याय दूर करून सवलती व योजना लागू कराव्यात महाराष्ट्रातील बंजारा जमातीसाठी राज्य मागास आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती बापट आयोग व सर्व आयोगाने केलेल्या शिफारशी मान्य करून त्या केंद्र सरकारकडे पाठविण्यात याव्या, महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेली सेंट्रल प्रोविन्स बेरार नागपूरच्या शिफारसी समवेत हैदराबाद गॅझेट लागू केल्याची अधिसूचना निमंत्रित करून वसंतराव नाईक व तत्कालीन शासनाच्या आणि न्यायमूर्ती बापट व अन्य आयोगांचे या जमाती संविधानाच्या अनुच्छेद 342 (2) नुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारीत (विजा अ) ची टक्केवारी स्वतंत्रपणे समावेश करणारी राज्य शासनाची स्पष्ट शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदनातून मागण्या करण्यात आल्या आहे.
 
 
बंजारा समाजाला अनुसूचित जाती समाविष्ट करण्यासाठीचा 2016 पासून ते 2024 पर्यंतचे सर्व लेखाजोखा निवेदनासोबत समाजाच्या वतीने जोडण्यात आला होता. मोर्चामध्ये बंजारा समाजातील महिलांनी आपल्या परंपरागत वेशभूषेत उपस्थिती दर्शवली. पारंपरिक वाद्याच्या गजरात मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चाला मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर केल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.
 
 
Banjara community- Dhadak Morcha मोर्चासाठी गोरसेनाचे तालुकाध्यक्ष आकाश आडे, गोपाल राठोड, सूरज राठोड, राम राठोड, बबलू जाधव, नामदेव राठोड, रोहिदास जाधव, योगेश चव्हाण, डॉ. प्रतीक रुडे, शेषराव जाधव, कान्हा जाधवसह विवेक मुडे, रमेश चव्हाण, अर्जुन राठोड, डॉ. राम नाईक, अरुणा राठोड, सुनीता चव्हाणसह शेकडो समाज बांधव महिला भगिनी व अनेक पदाधिकारी व सकल बंजारा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0