मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
अमरावती,
tiger in Melghat मेळघाट वनक्षेत्रातील नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी शुक्रवारी मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पर्यावरण व वन मंत्री गणेश नाईक, आमदार रवी राणा, आमदार केवलराम काळे, यशवंत केवलराम काळे तसेच शैलेश म्हाला उपस्थित होते.
तात्काळ शासनसेवेत घ्या
बैठकीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तात्काळ अनुकंपा तत्वावर शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश मंत्री गणेश नाईक यांनी दिले. मेळघाटमधील वन विभागाकडून थांबवण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना नव्याने गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. tiger in Melghat थांबवण्यात आलेल्या आणि नव्याने डांबरीकरणासाठी मंजुरी दिलेल्या रस्त्यांमध्ये बारूखेडा ते झरी, चौराकुंड ते फुकमार, खोकमार ते दतरू, राजापूर ते रेटाखेडा, माखला ते जरीदा, रेस्ट हाऊस ते हरिसाल, कोंगळा ते कळमगुना, केशरपूर ते मालूर, फॉरेस्ट ते जाबळी आर रेंज याचा समावेश आहे. या रस्त्यांवर काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकार्यांना देण्यात आले.
विश्रामगृहांची होणार दुरूस्ती
मेळघाटच्या आदिवासी भागातील विकासासाठी महत्त्वाचा निर्णय म्हणजे बेलकुंड, ढाकणा, हात्रू, तारू, बांदा, माखला, कोकरू, कोलकास, सीमाडोह, घाटांग येथील वन विभागाच्या विश्रामगृहांची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि सौंदर्यीकरणाचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. tiger in Melghat अमरावती तालुक्यातील मंजूर रामवाटिका २५ कोटी रुपयाचे बांधकाम करण्याचे संबंधी निर्णय घेण्यात आला. या बैठकीस अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैस्कर, प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर श्रीनिवास, प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीवन) नागपूर, मुख्य वनरक्षक अमरावती, तसेच वनरक्षक व क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प रेड्डी आणि उपवनसंरक्षक अमरावती हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयांमुळे मेळघाटातील नागरिकांमध्ये दिलासा मिळणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्याविरोधात संरक्षण आणि आदिवासी भागाचा विकास या दोन्ही बाबतीत शासनाने ठोस पावले उचलली आहेत.