३७ वर्षीय अभिनेत्याचा बिल्डिंगमधून पडून मृत्यू

12 Sep 2025 15:31:06
बीजिंग,
Death of Alan Yu Menglogkhwa मनोरंजनसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय चीनी अभिनेता एलन यू मेंगलोग याचे वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झाले आहे. बीजिंग येथील एका इमारतीतून तो पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ११ सप्टेंबर २०२५ रोजी घडली असून त्यानंतर संपूर्ण चाहतावर्ग शोकसागरात बुडाला आहे. या घटनेची माहिती अभिनेत्याच्या टीमने सोशल मीडियावरून अधिकृतरीत्या दिली. त्यांच्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की, आमच्या प्रिय मेंगलोगला ११ सप्टेंबरला एका दुर्दैवी घटनेचा सामना करावा लागला.
 

Death of Alan Yu Menglogkhwa
 
बिल्डिंगमधून पडल्याने त्यांचे निधन झाले. पोलिसांनी तपासानंतर स्पष्ट केले आहे की या घटनेत कोणताही गुन्हा नाही.” या दुर्दैवी घटनेनंतर मनोरंजनसृष्टीसोबतच कुटुंबीय, Death of Alan Yu Menglogkhwa मित्रपरिवार आणि चाहते मोठ्या दुःखात आहेत. सोशल मीडियावर जगभरातील चाहत्यांनी एलन यू मेंगलोग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेता बिल्डिंगमधून नेमका कसा पडला, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. त्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Powered By Sangraha 9.0