चांदूर रेल्वे तालुक्यात धुव्वाधार पाऊस

12 Sep 2025 21:59:36
चांदूर रेल्वे,
Heavy rain शुक्रवारी दुपारी चांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. सदर पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे यंदा शेतीपिकांच्या नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
 
Heavy rain
 
चांदूर रेल्वे शहरातून बायपासकडे व पळसखेडकडे जाणार्‍या महत्त्वाच्या मार्गावर नाल्याचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहू लागले. परिणामी हा मार्ग काही तासांसाठी वाहतुकीस बंद होता. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. सदर नाल्याला कठडे नसल्याने नाला आणि रस्ता अक्षरशः एकसमान दिसत होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केल्या जात होती. Heavy rain या पुलावर तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. दरम्यान, या नाल्याजवळील रेल्वे ब्रिजखालील रस्त्यावरही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले. चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना येथे मार्गक्रमण करताना मोठा त्रास सहन करावा लागला. संपूर्ण तालुक्यात झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतशिवारातही पाणी साचले असून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
Powered By Sangraha 9.0