अवैध गॅस रिफिलिंगचे मोठे रॅकेट उघड

12 Sep 2025 21:52:03
नांदगाव पेठ,
illegal gas refilling racket exposed परिसरातील शासकीय वसाहतमध्ये नांदगाव पेठ पोलिसांनी धडक कारवाई करून अवैध गॅस रिफिलिंगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.१२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. एका घरात धाड टाकताच एलपीजी सिलेंडरची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून मशीनद्वारे अवैधरित्या रिफिलिंगचे काम सुरू असल्याचे आढळून आले. या धाडीत तब्बल ५८ एलपीजी सिलेंडर, ३ रिफिलिंग मशीन, २ मोठे वजन काटे असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला.
 
 
racket exposed
 
या प्रकरणी साबीर लष्कर हासिम लष्कर (वय ४०, रा. शासकीय वसाहत, नांदगाव पेठ) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारा हा अवैध व्यवसाय उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सिलेंडर मधून गॅस रिफिलिंग करून ऑटोचालक व ग्राहकांना विकण्याचा गोरखधंदा याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. illegal gas refilling racket exposed सिलेंडरच्या अवैध साठवणुकीमुळे आणि मशीनद्वारे केलेल्या बेकायदेशीर रिफिलिंगमुळे कोणत्याही क्षणी भीषण स्फोट होऊन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. याबाबत पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांना गुप्त माहिती मिळाली होती. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले. ही धडक कारवाई पो. उपनि. नवलकर, निलेश साविकार, राजा सय्यद, राजिक खान आणि वैभव तिखीले यांनी केली. अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई सुरू राहावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0