मुलाने केला वडिलांचा निर्घृण खून

खावटी वाद, पिंपरी थुगावची घटना

    दिनांक :12-Sep-2025
Total Views |
चांदूरबाजार,
Son brutally murders father कुटुंबातील खावटीच्या वादाने भडकलेल्या संतापातून एका ३८ वर्षीय मुलाने आपल्या ७५ वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केली. ही घटना चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी थुगाव गावात दुपारी साडेबारा वाजता घडली व सांयकाळी समोर आली. आरोपी मुलगा महेश माणिक सोसे याने रोल पाईपने वडिलांच्या डोक्यावर वार केले, ज्यामुळे माणिक सोसे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलाला अटक करण्यात आली.
 

murder 
 
माणिक सोसे यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या नावाने न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला होता. १९ ऑगस्ट रोजी कोर्टाने वारंट जारी करून दोनही मुलांना हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार, दोन हजार रुपये मासिक खावटी मंजूर झाली. आजपर्यंत २५ हजार भरणे करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. Son brutally murders father मात्र, आरोपी महेश याच्याकडे पैसे नसल्याने तो संतापला होता. त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्याला दारूचे व्यसन लागले होते. त्याच धुंदीत त्याने वडीलांवर हल्ल केला.
 
 
माणिक यांचा दुसरा मुलगा गोपाल सोसे (वय ४२) याने घटनेनंतर तात्काळ चांदूरबाजार पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. चांदूरबाजारचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात तपास पथक कार्यरत आहे. Son brutally murders father या तपासात भूषण भैसाने, विष्णू पांडे, विनोद इंगळे, पूजा माळी, रोशन चव्हाण, अमोल सानप, संकेत चोरे, नरेंद्र आदी पोलिस कर्मचारी सहभागी आहेत.