पसायदान वैश्विक सद्भावनेचा साक्षात्कार

वक्ते डॉ. संजय उपाध्ये प्रतिपादन

    दिनांक :12-Sep-2025
Total Views |
अमृतमंथन व्याख्यानमाला प्रथम पुष्प
 
अमरावती,
Dr. Sanjay Upadhyay संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या २१ व्या वर्षी इ.स.वी सन १२९६ मध्ये इंद्रायणी काठी देवाची आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर माउलीच्या समाधीला ७५० वर्षे आज पूर्ण होत आहेत. माउलीचे पसायदान वैश्विक सद्भावनेचा व प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार होय. ते जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे आहे, असे प्रतिपादन लेखक व वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. तुषार भारतीय मित्र परिवारतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही शुक्रवारपासून तीन दिवसीय अमृतमंथन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आता विश्वात्मके देवे’ या विषयावर वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांनी पहिले पुष्प गुंफले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्रा. प्रशांत इंगोले तर प्रमुख पाहुणे तुषार भारतीय, चेतन गावंडे, रेखा भुतडा, लता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
Dr. Sanjay Upadhyay
 
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भागवत धर्माचा अंगीकार करून कोणीही ईश्वर प्राप्त करून घेऊ शकतो. हे बीज माउलींनी जनसामान्यांत रोवले. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मुख्य प्रेरणास्त्रोत हे त्यांचे बंधू विश्वगुरू संत श्री निवृत्तीनाथ यांना मानले जाते. Dr. Sanjay Upadhyay श्री भगवत गीतेचे ७०० श्लोक व १८ अध्याय आहेत. या ७०० श्लोकांवर संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी ९००० ओव्या लिहिल्या व प्रत्येक ओवीला विश्लेषित केले. ज्ञानेश्वर माउली यांनी ज्ञानेश्वरीत कर्मयोग, भक्तियोग व ज्ञान योगाचे महत्त्व विशद केले आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञान आणि भक्तीचे प्रतिक बनले आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे भारतीय संस्कृती आणि संत वाड्ंमयाकडे अखिल विश्वाचे लक्ष वेधले गेल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्तविकात आयोजक तुषार भारतीय यांनी केले. सूत्रसंचालन मंदार नानोटी, आभार ज्ञानेश्वर टाले यांनी मानले. शेवटी हभप ज्ञानेश्वर गुल्हाने महाराज यांनी पसायदानाचे गायन केले. व्याख्यानाला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.