टीचर कहती हैं 'आमीन' बोलो...

धार्मिक शिक्षणाचा आरोप

    दिनांक :13-Sep-2025
Total Views |
उत्तर प्रदेश,
Ameen controversy उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील मंंडावर येथील एका खासगी शाळेत धार्मिक शिक्षण दिलं जात असल्याचा आरोप करत एका महिलेने शाळेच्या गेटसमोर जोरदार हंगामा केला. ही महिला आपल्या एलकेजीत शिकणाऱ्या मुलाची पालक असून, तिच्या मते शाळेत मुलांना प्रार्थना झाल्यानंतर ‘आमीन’ म्हणण्यास सांगितले जाते, जे त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात असल्याचं तीचं म्हणणं आहे.
 

Bijnor school Ameen controversy 
महिलेने सांगितले की, तिचा मुलगा घरी परतल्यानंतर जेवणाच्या आधी प्रार्थना करत होता आणि शेवटी 'आमीन' म्हणाला. जेव्हा तिने मुलाला विचारले की त्याला हे कोणी शिकवले, तेव्हा त्याने सांगितले की शाळेतील शिक्षिका सर्व विद्यार्थ्यांना प्रार्थनेनंतर ‘आमीन’ म्हणण्यास सांगतात.
या प्रकरणावर Ameen controversy  शिक्षिकेला विचारले असता, तिने कबूल केले की पूर्वी असे होत होते, मात्र आता शाळेत 'आमीन' म्हणण्याचे बंधन नाही. मात्र, या उत्तरावर समाधानी नसलेल्या महिलेने शाळा प्रशासनावर तीव्र आक्षेप घेतला आणि थेट शाळेच्या गेटसमोर जाऊन निषेध व्यक्त केला. तिने प्रशासनावर विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्माच्या विरोधात शिकवण देत असल्याचा आरोप केला.महिलेने शाळा प्रशासनाकडे अधिकृत स्पष्टीकरण मागितले असून, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये याची हमी मागितली आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आलेली नसली, तरी या घटनेने परिसरात धार्मिक शिक्षणावरुन नव्याने वादाची ठिणगी पडली आहे.शाळा प्रशासनानेही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पूर्वी शाळेत 'आमीन' म्हणण्याचा प्रघात होता, मात्र आता असे काही शाळेमध्ये घडत नाही. तरीसुद्धा, या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.सध्या प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, समाजात शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी स्थानिक पातळीवर समजूतदारपणाने वागण्याचे आवाहन करण्यात येत आहे.