अशनीर ग्रोवर आणि सलमान खानमधील वाद पुन्हा चर्चेत

14 Sep 2025 13:28:56
मुंबई,
Ashneer Grover अशनीर ग्रोवर आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांच्यातील वाद आता कुणापासून लपलेला नाही. यापूर्वीही दोघांनी एकमेकांच्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली होती. सध्या सलमान खान ‘बिग बॉस १९’ होस्ट करत आहेत, तर अशनीर ग्रोवर ‘राइज अँड फॉल’ नावाच्या नव्या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत.
 

Ashneer Grover 
अलीकडे एका मुलाखतीदरम्यान अशनीर यांनी त्यांच्या नव्या शोबद्दल बोलताना अप्रत्यक्षपणे सलमान खानवर टीका केली. जरी त्यांनी थेट सलमान किंवा ‘बिग बॉस १९’चे नाव घेतले नाही, तरी संदर्भ स्पष्ट होता.अशनीर म्हणाले, "रिअ‍ॅलिटी शो स्पर्धकांबद्दल असायला हवेत. भारतात एक मोठा शो आहे ज्यामध्ये एक मोठा सुपरस्टार आहे, त्यामुळे तो शो स्पर्धकांपेक्षा त्यांच्याबद्दलच अधिक झालाय. पण खरी गोष्ट अशी आहे की, शोमध्ये पूर्ण वेळ कोण गुंतलेले असते? तुम्ही तर आठवड्याच्या शेवटी दिसता. २४ तास जो खराखुरा कंटेंट देतो, तो स्पर्धक असतो. त्यामुळे सत्ता आणि लक्ष यांचे संतुलन स्पर्धक आणि त्यांच्या कंटेंटमध्ये असायला हवे, ना की अशा कुणा व्यक्तीकडे ज्याला लोक ओळखतात आणि जो फक्त वीकेंडला शोमध्ये येतो."
 
 
यापूर्वीही अशनीर आणि सलमान यांच्यात ठिणग्या उडाल्या होत्या. एका जुन्या मुलाखतीत अशनीर यांनी सलमान खानसोबत घडलेल्या एका अनुभवाचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, एका जाहिरात शूटदरम्यान ते सलमानला भेटले होते. त्यावेळी सलमानच्या मॅनेजरने त्यांना सांगितले होते की सलमान फोटो काढून घेणार नाहीत.अशनीर म्हणाले होते, “सलमान खानला भेटलो होतो. आम्ही त्याला ब्रँडसाठी स्पॉन्सर ठेवलं होतं, म्हणून शूटसाठी आलो होतो. शूटपूर्वी त्याला ब्रँडबद्दल सांगण्यासाठी ३ तास बसलो होतो. त्यानंतर त्याच्या मॅनेजरने सांगितलं, ‘फोटो नाही काढायचा, सर नाराज होतात’. मी म्हटलं, नाही काढणार फोटो, भाड्यात गेला. अशी काय हीरोपंती असते?"पुढे २०२४ मध्ये जेव्हा अशनीर ‘बिग बॉस १८’मध्ये गेस्ट म्हणून सहभागी झाले, तेव्हा सलमान खानने त्यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यावर त्यांना सुनावले. सलमानने अशनीरची खिल्ली उडवत त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला की ते काय बोलतात आणि स्वतःला कसे सादर करतात, याकडे लक्ष द्यायला हवे.
Powered By Sangraha 9.0