दुबई,
India vs Pakistan दुबई येथे आज (१४ सप्टेंबर) आशिया चषक टी-20 स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष लागले आहे.भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शुभमन गिल या खेळाडूंवर मोठी जबाबदारी आहे. पाकिस्तानकडून बाबर आझम, मोहम्मद रिजवान आणि शाहीन अफ्रिदी यांची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.
या सामन्यात विजय मिळवून सुपर-४ मध्ये स्थान पक्के करण्याचे उद्दिष्ट दोन्ही संघांसमोर आहे. भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंचा चांगला समतोल असून, पाकिस्तान संघाची ताकद गोलंदाजीत आहे.जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडील दहशतवादी हल्ल्यांमुळे झालेल्या शहीद जवानांच्या स्मरणार्थ भारतीय खेळाडू हा सामना देशासाठी अर्पण करण्याच्या निर्धाराने उतरतील, असे वातावरण संघात आहे.
कुठे राहील सामना
स्थळ: आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
वेळ: संध्याकाळी ६.३० वा. भारतीय प्रमाणवेळेनुसार
सामन्यावर बहिष्कार
या सामन्याच्या अगोदर मोठ्या India vs Pakistan घडामोडींना वेग आला. भारतीय संघातील काही खेळाडू हे सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जातंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, अशी लोकांची भावना आहे. कारण काही दिवसांपूर्वीच झालेल्या हल्ल्यात अनेक भारतीयांचे जीव गेले. हेच नाही तर हिंदू पर्यटकांना धर्म विचारून पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. या ह्ल्लाला काही महिने पूर्ण होत नाहीत तोवरच भारतीय संघ पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत असल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.