भारत-पाक सामना... पण खेळाडूंच्या अडचणी वाढवणार?

14 Sep 2025 13:51:40
दुबई,
India vs Pakistan भारत-पाकिस्तान सामना आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार असून, सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. भारताने पहिल्या लढतीत यूएईवर ९ गडी राखून विजय मिळवला होता, तर पाकिस्तानने ओमानचा ९३ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
 

India vs Pakistan  
या सामन्यादरम्यान हवामान खेळाडूंना अडचणीत आणू शकते. ॲक्यूवेदरच्या अंदाजानुसार, तापमान सुमारे ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून, त्यामुळे खेळाडूंना उष्णतेचा त्रास होऊन थकवा जाणवू शकतो. पावसाची शक्यता जवळपास नाहीच आहे.
 
 
दुबईची India vs Pakistan  खेळपट्टी सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना मदत करणारी मानली जाते. गती आणि उसळी मिळाल्याने सुरुवातीला फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र सामना जसजसा पुढे जाईल, तसतसे फलंदाजांना धावा काढणे सोपे होईल. या मैदानावर फिरकी गोलंदाजांनाही चांगली साथ मिळते, त्यामुळे भारतीय संघ फिरकीवर भर देऊ शकतो.या मैदानावर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने ५२ सामने जिंकले आहेत, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ५९ सामने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.भारतीय संघाची संभाव्य अकरा अशी असेल – अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्ती.
Powered By Sangraha 9.0