मुंबई,
Sanjay Datt बॉलिवूडचा 'संजू बाबा' म्हणजेच संजय दत्त पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धडाकेबाज भूमिकेत परततोय. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'बागी 4' मध्ये त्यांनी विलनची भूमिका साकारली होती, पण चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र आता संजय दत्त एका दमदार साउथ इंडियन अॅक्शन फिल्ममध्ये झळकणार आहेत – ती म्हणजे ‘KD DEVIL’.
या चित्रपटात संजय दत्त 'Dhak Deva' या खतरनाक व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. त्यांचा पहिला लूक आधीच व्हायरल झाला असून चाहत्यांनी तो डोक्यावर घेतला आहे. ही फिल्म KVN Productions तर्फे तयार केली जात आहे आणि यात मुख्य भूमिकेत ध्रुव सरजा झळकणार आहेत.या चित्रपटात अजून एक मोठं नाव जोडण्यात आलं आहे – आणि ते म्हणजे किचा सुदीप. 'दबंग 3' मध्ये सलमान खानचा खलनायक 'बल्ली सिंह' साकारलेला किचा सुदीप आता संजय दत्तसोबत एकाच टीममध्ये दिसणार आहे. सोशल मीडियावर KVN प्रॉडक्शनने खास फोटो शेअर करत सुदीपचं फुलांनी स्वागत केलं.
याशिवाय, या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि नोरा फतेही यांचाही समावेश आहे. आधी हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल.‘KD Devil’ व्यतिरिक्त संजय दत्त आणखी काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहेत. त्यामध्ये ‘द राजा साब’ ही फिल्म पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला येणार आहे, तर ‘धुरंधर’ वर्षाच्या शेवटी रिलीज होईल. या दोन्ही चित्रपटांमध्येही ते नकारात्मक भूमिका साकारणार आहेत.संजय दत्त आता फक्त बॉलिवूडपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो साउथच्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसचा देखील लाडका अभिनेता झाला आहे. 'KD Devil' मध्ये त्याचं धक-धक देणारं रूप आणि सुदीपसारखा स्टार सोबत असणं, हे निश्चितच प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानी ठरणार आहे.