वर्धा,
Vinoba Bhave महात्मा गांधी यांच्या विचारांचा विनोबा भावे यांच्यावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उतीत आणि व्यतिमत्त्वात विनोबांना आढळल्या. १९१६ मध्ये अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात गांधीजींना गाठून त्यांच्या विचारांचा स्वीकार केला. गांधीजींनी पुकारलेल्या वैयतिक सत्याग्रहाचे ते पहिले सत्याग्रही होते. ‘आचार्य’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विनोबांनी ‘गीताई’ या नावाने भगवद्गितेचे मराठीत भाषांतर केले. विनोबा भावे म्हणजे ऋषितुल्य व्यतिमत्व, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.
११ सप्टेंबर रोजी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त अग्निहोत्री महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या महान कार्यांचा गौरव करताना ते बोलत होते. पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले की, महान योगी, आचार्य विनायक भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्रातील गागोदे येथे झाला. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रखुमाबाई तर त्यांच्या आजोबाचे नाव शंभुराव भावे. वाईच्या ब्राह्मणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर हे भावे यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्निहोत्र स्वीकारून अग्निहोत्र शाळा स्थापन केली. आजोबा आणि मातोश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. आचार्य विनोबा भावे यांचे मुख्य कार्य म्हणजे भूदान चळवळ, ज्याला रतहीन क्रांती असेही म्हणतात. १९५१ साली तेलंगणातील पोचमपल्ली गावातून सुरू झालेली ही चळवळ म्हणजे गरिबांना जमीन वाटप करून सामाजिक न्याय देण्याचा एक स्वैच्छिक प्रयत्न होता.
१९२१ साली गांधींचे Vinoba Bhave भत जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्धेला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधींनी विनोबांची रवानगी वर्धेला केली. ८ एप्रिल १९२१ रोजी विनोबा वर्धेला पोहोचले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य १९५१ ते १९७३ पर्यंतची भूदानयात्रा सोडल्यास या वर्धेच्या आश्रमातच राहून तपश्चर्या करीत घालविले. हा वर्धेचा आश्रम क्रमाने मगनवाडी, बजाजवाडी, महिलाश्रम, सेवाग्राम व पवनार या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्धेच्या ८ किमी परिसरातच आहेत. दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यामध्ये त्यांनी घालविले. गांधीजींचे अनुयायी असल्याने त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि सामाजिक-धार्मिक कार्यांमध्येही महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी सर्वोदय आणि अहिंसक तत्वांवर आधारित समाज निर्मितीवर भर दिला. त्यांच्या गीताई, गीताप्रवचन, मधुकर आणि सर्वोदय विचार यासारख्या अनेक पुस्तकांनी लोकांना प्रेरणा दिली, असेही पं. अग्निहोत्री यांनी यावेळी सांगितले.आज विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त अग्निहोत्री महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या महान कार्यास अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.