मुंबई ,
Katrina Kaif बॉलिवूड अभिनेत्री कैटरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार, अशी जोरदार चर्चा सध्या मनोरंजन विश्वात रंगली आहे. गेले काही महिने कैटरिना चित्रपटसृष्टीपासून दूर असून, ना कुठल्या चित्रपटात झळकताना दिसत आहेत, ना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
कैटरिना कैफ गर्भवती असून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये गुड न्यूज जाहीर होण्याची शक्यता आहे.” मात्र, या चर्चांवर अद्याप कैटरिना किंवा विक्कीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.अलीकडेच कैटरिनाला अलीबागमध्ये स्पॉट करण्यात आले होते. त्या वेळी त्या ओव्हरसाईज्ड कपडे घालून फिरत होत्या, ज्यामुळे प्रेग्नंसीच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. शिवाय, त्या गेल्या काही काळात सोशल मीडियावरही फारशा अॅक्टिव्ह नाहीत आणि कुठल्याही नव्या प्रोजेक्टच्या घोषणाही त्यांनी केलेल्या नाहीत. त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता आणि चर्चांचा सूर वाढलेला आहे.
असे सांगितले जात Katrina Kaif आहे की, कैटरिना कैफ आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी मॅटर्निटी ब्रेक घेण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या करिअरमध्येही यामुळे काही काळ विश्रांती येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अनेक वेळा त्यांच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्या नंतर अफवाच ठरल्या. विक्की कौशलनेदेखील एका मुलाखतीत या चर्चांवर विनोदी शैलीत प्रतिक्रिया देताना म्हटले होते, "सध्या 'बॅड न्यूज' (चित्रपट) एंजॉय करा, गुड न्यूज आली की आम्ही नक्की सांगू."
वर्क फ्रंटवर नजर टाकल्यास, कैटरिना कैफ शेवटचं मोठ्या पडद्यावर जानेवारी २०२४ मध्ये आलेल्या ‘मेरी क्रिसमस’ या क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथचे प्रसिद्ध अभिनेते विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते. तसेच राधिका आपटे, संजय कपूर आणि अदिती गोवित्रिकर यांसारखे कलाकारही या चित्रपटाचा भाग होते. त्यानंतर कैटरिनाच्या पुढील प्रोजेक्टची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.दरम्यान, चाहत्यांमध्ये मात्र उत्सुकतेचं वातावरण आहे. विक्की-कैटरिनाने लवकरच अधिकृत घोषणा करावी, अशी अपेक्षा सोशल मीडियावर त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमधील या लोकप्रिय कपलच्या घरी येणाऱ्या ‘गुड न्यूज’ची अधिकृत पुष्टी होईपर्यंत, ही चर्चा मनोरंजन विश्वात रंगतदार राहणार, हे निश्चित.