'आखिर भारत की पैदाइश है' नेमका प्रकार काय बघा व्हिडीओ

    दिनांक :15-Sep-2025
Total Views |
दुबई,
India-Pakistan match viral video रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या आशिया कप २०२५ च्या भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्याचा खरा शो-स्टॉपर ठरला तो एक पाकिस्तानी चाहता. सामना संपण्याआधीच, भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचत असताना त्याने स्टेडियममध्ये असे काही केले की त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला.
 

फगगघज  
  
तो चाहता संपूर्ण सामन्यात पाकिस्तानची जर्सी घालून आपल्या संघाला समर्थन देत होता. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला २० षटकांत फक्त १२७ धावांत रोखले. शाहीन आफ्रिदीच्या ३३ धावांमुळे संघ दोन अंकी धावसंख्या गाठू शकला. मात्र, भारतीय गोलंदाज कुलदीप यादवच्या (३ बळी) आणि जसप्रीत बुमराहच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानी फलंदाजी कोसळली.
 
 
 
भारताकडून १२८ धावांचे सोपे लक्ष्य फलंदाजांनी सहज गाठले. सूर्यकुमार यादवने नाबाद ४७ धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. त्याचवेळी, India-Pakistan match viral video स्टेडियममधील वातावरणात एक अनपेक्षित वळण आले. पाकिस्तानी चाहत्याने आपल्या पाकिस्तानच्या जर्सीवरून भारताची जर्सी परिधान केली आणि डान्स सुरू केला. भारतीय प्रेक्षकांनी उत्साहाने त्याचे स्वागत केले, तर पाकिस्तानी चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि निराशा पसरली.
हा क्षण तिथे उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांनी मोबाईलमध्ये कैद केला. काही मिनिटांतच तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटिझन्सनी त्या चाहत्याच्या या कृतीवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या. काहींनी म्हटले की हा आहे खरा क्रीडा भाव, तर काहींनी विनोद करत विजय पाहून त्याचे मन बदलले अशी टिप्पणी केली. पाकिस्तानचा पराभव होताच त्यांचे अनेक चाहते स्टेडियममधून बाहेर पडू लागले, मात्र या एका चाहत्याने नाच करून भारतीय विजयाचा आनंद लुटला. या घटनेने सामन्याचा माहोल अधिक रंगतदार झाला.