भिडे हायस्कूलमध्ये कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण

    दिनांक :16-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Bhide High School भिडे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजने विद्यार्थिनींच्या आरोग्यसंवर्धनासाठी कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून समाजासाठी आदर्श घालून दिला आहे. ९ ते २० वयोगटातील ९८ विद्यार्थिनींना Cervavac ही कॅन्सर प्रतिबंधक लस देण्यात आली.या उपक्रमासाठी कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ सावजी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पारुल सावजी या समाजाभिमुख दांपत्याने पुढाकार घेतला. त्यांच्या मातोश्रींच्या षष्ट्यब्दीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. सावजी दांपत्य आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना मोफत लस व स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतात. डॉ. पारुल सावजी यांना या कार्यासाठी सुवर्णपदकाने गौरविण्यात आले आहे.
 
bhide
 
ही मोहीम डॉ. भाग्यश्री गंधे व डॉ. निर्मला वझे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. Bhide High School मुख्याध्यापिका अर्चना गढीकर, पर्यवेक्षिका नीता कुकडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विनोद चिकटे तसेच सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.या लसीकरण मोहिमेमुळे कॅन्सरविषयी जागरूकता वाढून कॅन्सरमुक्त समाजनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
सौजन्य:अमोल तपासे, संपर्क मित्र