खामगाव
engineers day स्थानिक वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था खामगाव द्वारा संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे दिनांक 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन हा मोठ्या उत्साहात महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर दादा फुंडकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम राबविल्या जातात,या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आजच्या काळात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणेu एवढेच ध्येय न ठेवता, नवकल्पना, संशोधन आणि समाजहितासाठी उपयोगी अशा संकल्पना विकसित करणे ही खरी जबाबदारी आहे.
त्याप्रमाणे ‘अभियंता दिन’ या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये क्विज कॉम्पिटिशन, प्रोग्राम डेव्हलपमेंट, सर्किट डिझाईन, ब्रिज मिना, थ्रीडी ड्रॉईंग, सिवि रायटिंग, ग्रुप डिस्कशन, इन हाऊस "हॅकाथोन" अशा विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी , तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे, अधिष्ठता प्रा. धीरज वानखडे, आणि विद्यार्थी प्रतिनिधी मधून प्रेसिडेंट ऑफ इंत्रेप्रेनरशीप अँड डेव्हलमेंट सेल वेदांत गव्हाणे, प्रेसिडेंट ऑफ इंनोवेशन अँड इंत्रेप्रेनरशिप काऊन्सिल यशवंत हिवरखेडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारताचे पहिले अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत कुलकर्णी आपल्या भाषणामध्ये संबोधन करीत अभ