प्रत्येक भारतीयाने स्वदेशीचा स्विकार करावा

16 Sep 2025 13:10:33
नागपूर,
swadeshi भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्येच्या स्वदेशी ऐवजी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तूंना प्राधान्य देणे म्हणजे स्वयंरोजगार करीत असलेल्या व्यक्तींना कमकुवत करण्यासारखे झाले आहे.स्वदेशी ही आपल्या देशाची ओळख असल्याने प्रत्येक भारतीयाने स्वदेशीचा स्विकार करावा,असे आवाहन कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी केले.
 

जूट  
 
 
देशभरातील व्यापार्‍यांचे बहुप्रतिक्षित दोन दिवसीय व्यापारी जुटान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते होते. रवीनगर चौकातील अग्रसेन भवन येथे आयोजित परिषदेत कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रवीण खंडेलवाल, असुनिल सिंघवी, स्वदेशी जागरण मंचचे अध्यक्ष आर. सुंदरम, फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र कुमार, भारतीय उद्योग व्यापार मंडळाचे अध्यक्ष सतीश चौहान, राष्ट्रीय सह-संयोजक सतीश कुमार, व्यापार जुटानचे राष्ट्रीय संयोजक दीपक शर्मा,राष्ट्रीय समन्वयक अजय पत्की यांच्यासह व्यापारी-हॉकर्स संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहान देणे आवश्यक
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासोबतच लघु, मध्यम आणि पारंपारिक व्यावसायिक प्रतिष्ठानांना पुनरुज्जीवन करण्यासाठी देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहान देणे आवश्यक झाले आहे. आगामी २०४७ पर्यंत आपला देश पूर्णपणे स्वदेशी करण्यासाठी आतापासून प्रयत्न करावे लागणार आहे. भारताचे आर्थिक स्वातंत्र्य आणि जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी सर्व व्यापार्‍यांना स्वदेशी वस्तूंच्या विक्रीला व प्रचाराला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागणार आहे, असे स्पष्ट मत कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी मांडले.
स्वावलंबी भारताची संकल्पना गरजेची
स्वदेशी विचारसरणीला बळकटी देऊन स्वावलंबी भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणणे गरजेचे झाले असल्याचे स्पष्ट प्रतिपादन स्वदेशी जागरण मंचचे अध्यक्ष आर. सुंदरम यांनी परिषदेच्या पहिल्या दिवशी ’स्वदेशी अपनाओ - भारत बनाओ’ असा नारा देत स्वदेशीचा संकल्प करण्यात आला. असुनिल सिंघवी म्हणाले, भारताच्या अर्थव्यवस्थेची खरी ताकद आपले स्वदेशी उद्योग आणि व्यापारी आहेत. जर आपण सर्वांनी मिळून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले तर देशाचा जीडीपीच भक्कम होणार नाही तर लाखो तरुणांना रोजगारही मिळेल.swadeshi प्रत्येक घरापर्यंत संदेश फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र कुमार म्हणाले, देशभरातील लाखो फेरीवाले सामान्य लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवतात. जर त्यांना स्वदेशी उत्पादने उपलब्ध करून दिली गेली तर ते प्रत्येक घरापर्यंत स्वदेशीचा संदेश पोहोचवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावू शकतात. विविध प्रमुख व्यापार संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने ठराव केला की येणार्‍या काळात भारतातील व्यापारी स्वदेशी वस्तूंच्या प्रचाराला आपले मुख्य उद्दिष्ट राहील.
Powered By Sangraha 9.0