नागपूर,
Hindi Day Celebration राष्ट्रीय एकता प्रस्थापित करण्यात हिंदी भाषेची सर्वात मोठी भूमिका आहे. हिंदी ही संवादाची आणि राष्ट्रीय एकतेची भाषा आहे," असे प्रतिपादन आयकर विभागाचे सह आयुक्त संजय अग्रवाल यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात आयोजित हिंदी दिवस सोहळ्यात ते बोलत होते.
विशेष अतिथी आर.एन. मिश्रा यांनी हिंदी ही केवळ अधिकृत नव्हे तर सार्वजनिक भाषा असल्याचे सांगितले. विभागप्रमुख डॉ. मनोज पांडे Hindi Day Celebration यांनी हिंदी ही विचारांची तसेच तंत्रज्ञानाची भाषा असल्याचे अधोरेखित केले.या निमित्ताने निबंध लेखन, कविता, गीत गायन व वक्तृत्व अशा पाच स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या १५ विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन डॉ. लखेश्वर चंद्रवंशी व आभार प्रदर्शन डॉ. एकादशी जैतवार यांनी केले.
सौजन्य:डॉ. लखेश्वर चंद्रवंशी,संपर्क मित्र