नागपूर,
RTMNU राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन विभागा तर्फे एम.ए. प्रथम वर्ष नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन नुकतेच पार पडले.यावेळी श्रीगुरूदेव युवा मंचाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांचे साहित्य अभ्यासावे, तसेच त्यांच्या विचारांचा स्वतंत्र अभ्यासक्रम व परीक्षेच्या माध्यमातून प्रसार व्हावा, अशी सूचना केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून रक्षक, गुरुदेव सेवा मंडळाचे . दिलीप गाडगे उपस्थित होते.RTMNU सामुदायिक प्रार्थना गुरुदेव सेवा मंडळ तर्फे आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन प्रा. राहुल उईके यांनी केले तर आभारशांतिदास लुंगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. देवमन कामडी, प्रा. वर्षा पाटील, प्रा. दिव्या राजूरकर, प्रा. जिनेंद्र मेश्राम आदींचे सहकार्य लाभले.
सौजन्य:ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र