मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज: मुकाअ गुलाबराव खरात

16 Sep 2025 12:28:17
बुलढाणा,
gulabrao-kharat मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात लोकसहभागातून सुंदर स्वच्छ गाव जलसमृद्ध गाव कचरामुक्त बालस्नेही महिलास्नेही गाव करण्यासाठी ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणार्‍या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना त्यांच्या उत्कृष्ठ नियोजन वृक्षारोपण रक्तदान स्वच्छता गावातील पयाभूत सुविधा शाळा ग्रामपंचायत ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांची प्रभावी जलदगतीन अंमलबजावणी करून आरोग्य शिक्षण उपजिवीका सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात पुरस्कार योजना शासनाने घोषित केली आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याची माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
 
 

buldhana 
 
 
दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात या अभियानाची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेला उपमुकाअ ग्रामपंचायत संजय इंगळे, पस गटविकास अधिकारी सुरेश तायडे, माहिती अधिकारी पवनकुमार राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. मुकाअ गुलाबराव खरात यांनी सांगितले अनेक गावात स्वच्छतेचा अभाव असून कचरा ही प्रत्येक गाव व शहराची आरोग्यसाठी हानीकारक बनले आहे.gulabrao-kharat त्यासाठी कचरा निर्मुलन करणे पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण आरोग्य विषय रोगनिदान शिबिर स्वच्छ सुंदर गाव या संकल्पनेत बाळस्नेही कुपोषण मुक्त शैक्षणिक सुविधा निर्माण करून गावातील पायाभूत तसेच ग्रामपंचायत शाळा आरेाग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र याशिवाय महिलास्नेही गाव महिलांच्या समस्या विधवा परीतक्ता यांचे पर्नुविवाह करून सामाजिक आदरयुक्त सलोखा निर्माण करून भजन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन याशिवाय प्लॉस्टीक व कचरा यापासून बायो प्रकल्प तयार करणे जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायत मार्फत उत्कृष्ठ अभियाना राबविण्यार्‍या ग्रामपंचायतीसाठी तालुकास्तर पासून जिल्हा विभाग राज्यस्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीन तसेच पंचायत समिती जिल्हा परिषदांना विभाग व राज्यस्तरावर भरीव रक्कमेचे पुरस्कार देण्याची राज्य शासनाची लोकसहभागातून समृद्ध पंचायतराज ही शंभर गुणांवर आधारित परीक्षा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी आर्वजून केले आहे.
Powered By Sangraha 9.0