स्कूल बस, व्हॅनची झाडाझडती;आरटीओने केले चालकांचे समुपदेशन

16 Sep 2025 14:05:55
नागपूर
school bus van hit मानकापुरातील अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने शहरात विशेष मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत सोमवारी शहरात ठिकठिकाणी स्कूल बसेस, स्कूल व्हॅन्सची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाèयांकडून एक लाख 42 हजारांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. यावेळी आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चालकांचे समुपदेशन केले. वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करा, मोबाईलचा वापर करू नका, वाहतूक नियमांचे पालन करा आदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच मोटार वाहन कायद्यातील दंडात्मक तरतुदी व विविध गुन्ह्यांकरिता आकारण्यात येणारा दंड याबाबत वाहनचालकांना अवगत करण्यात आले.
 

RTO  
 
प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनात नागपूर (शहर) कार्यालय व नागपूर (पूर्व) कार्यालयाच्या तीन पथकांनी 221 स्कूल बसेसची तपासणी केली. दोषी आढळून आलेल्या 46 बसेसना ई-चालान जारी करण्यात आले. यातील 7 बसेसना योग्यता प्रमाणपत्र नव्हते. वैध परवाना, विमा, पीयूसी, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा नसणाèया 39 बसेस होत्या. 4 बसेस विविध पोलिस स्टेशन्समध्ये ठेवण्यात आल्या असून, नियमांचे पालन न करणाèया चालकांकडून एक लाख 42 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
शनिवारी झालेल्या तपासणीत एकूण 235 स्कूल बसेस, स्कूल व्हॅन्सची झाडाझडती घेण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाèया चालकांकडून 84 हजार 700 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.school bus van hit मोटार वाहन निरीक्षक सतीश नवघरे, पवन बानबाकडे, अर्चना घाणेगावकर, सहायक मोटार वाहन निरीक्षक राहुल वंजारी, समिपा चिकाटे व आकाश वालदे यांच्या पथकांनी ही कारवाई केली. ही मोहीम पुढील काही दिवस अशीच सुरू राहणार आहे.
वेग मर्यादेचे पालन करावे
प्रत्येक स्कूल बसचालकाने आपले वाहन तांत्रिकदृष्ट्या सक्षम ठेवावे, वाहनांची सर्व कागदपत्रे सोबत बाळगावी, वेग मर्यादेचे पालन करावे, वाहन सुरक्षित चालवावे आणि शालेय परिवहन समितीने जागरूक राहून वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करावी. चालकाचे चारित्र्य पडताळणी झाली असल्याची खात्री करून घ्यावी.
किरण बिडकर (प्रादेशिक परिवहन अधिकारी)
Powered By Sangraha 9.0