आध्यात्मिकता आणि चिकित्सा म्हणजे संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली : केंद्रिय आयुष प्रतापराव जाधव

    दिनांक :16-Sep-2025
Total Views |
बुलढाणा,
prataprao jadhav मन, शरीर आणि आत्म्याचा समतोलच हे परिपूर्ण आरोग्याचे मूळ आहे. राजयोग आणि ध्यान या दिशेने अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. त्यांनी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या चिकित्सा, व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य सुधारासाठी चाललेल्या जागतिक सेवांची प्रशंसा केली. देश-विदेशातून आलेले वैद्यकीय तज्ञ व आध्यात्मिक संशोधकांनी माइंड-बॉडी मेडिसिन क्षेत्रातील नवीन संशोधन सादर केले. आध्यात्मिकता आणि चिकित्सा यांचा संगम म्हणजे संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली असे प्रतिपादन केंद्रिय आयुषमंत्री प्रतापराव जाधवी यांनी केले.
 
 
 


adhyatmik 
 
 
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बुलढाणा येथील संचालिका ब्रह्माकुमारी उर्मिला दीदी यांनी दिलेल्या आग्रहास्तव निमंत्रण स्विकार करून भारत सरकारचे आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव दि. १२ सप्टेंबर रोजी ज्ञानसरोवर, ब्रह्माकुमारीज, माउंट आबू येथे आयोजित ५१व्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन माइंड-बॉडी मेडिसिन या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. माउंट आबू येथे मंत्र्यांनी ब्रह्माकुमारीज च्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी बी.के. मोहिनी दिदी यांची विशेष भेट घेतली व त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला.prataprao jadhav त्यांनी याला आपल्या जीवनातील आत्मिक उन्नतीचा क्षण म्हटले या कार्यक्रमाला डॉ. कार्यकारी सचिव, मेडिकल विंग बनारसीलाल साह, अध्यक्ष, मेडिकल विंग डॉ. अशोक आर. मेहता, अतिरिक्त सरचिटणीस, ब्रह्माकुमारीज डॉ. प्रताप मिधा, राजयोगिनी बी.के. मोहिनी दादी, बी.के. लक्ष्मी (मुन्नी दीदी), बी.के. प्रभा दीदी, संचालक डॉ. गोवर्धन दत्त पुरी डॉ. विपिन कौशल डॉ. अंशु प्रिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.
पूढे ते म्हणाले, आयुष मंत्रालय आणि ब्रह्माकुमारीज संस्था यांच्या दरम्यान भविष्यात चिकित्सा, योग, आयुर्वेद, मानसिक आरोग्य आणि इतर सामाजिक कल्याणकारी प्रकल्पांवर सहयोग वाढवला जाईल. भविष्यात आयुष मंत्रालय आणि ब्रह्माकुमारीज संस्था एकत्रितपणे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात — आरोग्य, विज्ञान आणि कृषी — नवी ऊर्जा व दिशा प्रदान करतील.
केंद्रियमंत्री जाधव यांनी संस्थेच्या चार प्रमुख स्थळांना — पांडव भवन, शांतिवन, ज्ञानसरोवर आणि ग्लोबल हॉस्पिटल — भेट दिली. ही यात्रा ब्रह्माकुमारीजमध्ये चार धाम यात्रा म्हणून ओळखली जाते. या प्रसंगी वरिष्ठ राजयोग शिक्षिका बी.के. शीलू दिदी यांनी त्यांना संस्थेचा इतिहास, जागतिक सेवा व सामाजिक उन्नतीसाठी चालणारे कार्य यांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी दिलेले निमंत्रण प्रतापरावजी जाधव यांनी स्वीकार केले. त्याबद्दल एकता नगर,बुलढाणा येथील ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी उर्मिला दीदी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.