विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत कॅम्पस भर्ती

16 Sep 2025 12:23:23
नागपूर,
Vidarbha Institute of Technology विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) महाविद्यालयात विएरा सीमनलेस प्रा. लि., एमआयडीसी उमरेड यांच्या सहकार्याने कॅम्पस रिक्रूटमेंट व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. अंतिम वर्षातील ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

manoj  
 
 
कंपनीच्या टीम सदस्य टारिक अजीज, अभिजित माईती व सतीश पुंड यांनी प्री-प्लेसमेंट टॉक, अॅप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल व एचआर मुलाखती घेतल्या.Vidarbha Institute of Technology या मोहिमेचे आयोजन प्राचार्य डॉ. एस. बी. देशपांडे, उपप्राचार्य डॉ. निलेश बोडणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. सौरभ लवाटे यांच्या समन्वयाने झाले. प्रा. ज्ञानेश्वर ठवकर, प्रा. अक्षता बगडे व विभागप्रमुखांचे सहकार्य लाभले.या प्रसंगी के.डी.एम. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जुगल महेश्वरी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सौजन्य:मनोज वैराळकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0