'स्वतःवर संशय येतो, पण आता टीका स्वीकारणं शिकले'

मलायका अरोराचा स्पष्ट सडेतोड स्वभाव

    दिनांक :17-Sep-2025
Total Views |
मुंबई
Malaika Arora बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही केवळ तिच्या अभिनयामुळेच नव्हे, तर तिच्या खासगी आयुष्यामुळे आणि ठाम व्यक्तिमत्त्वामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. कधी तिच्या कपड्यांमुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक नातेसंबंधांमुळे ती सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरी जाते. अरबाज खानपासून घटस्फोटानंतर तिचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं गेलं. या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर आलं. यानंतर पहिल्यांदाच मलायकाने एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि सतत होणाऱ्या ट्रोलिंगविषयी खुलेपणाने भाष्य केलं आहे.
 

Malaika Arora  
ति म्हणाली काय तिला लोकांकडून कायमच सल्ले मिळाले — काय घालावं, कुणाशी नातं ठेवावं, कोणतं काम करावं — यावर सतत टीका झाली. “सुरुवातीला हे सगळं खूप त्रासदायक होतं. मला वाटायचं, लोक काय म्हणतील याचा विचार करावा लागतो. पण नंतर एका क्षणी मी स्वतःला समजावणं थांबवलं. मी जेव्हा दुर्लक्ष करायला सुरुवात केली, तेव्हा खऱ्या अर्थाने मोकळं वाटू लागलं,” असं ती म्हणाली.
 
 
मलायकाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला — टीका आणि अफवांचा मानसिक परिणाम. “अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर लोकांनी माझ्यावर अनेक लेबेल लावली. मला ‘बोल्ड’, ‘बिनधास्त’ असं म्हटलं गेलं. पण जेव्हा हे सतत घडतं, तेव्हा माणूस स्वतःवरच संशय घेऊ लागतो. हा मानवी स्वभाव आहे. मीही त्याला अपवाद नाही,” असं ती स्पष्टपणे कबूल करते.
 
 
तथापि, Malaika Arora  या नकारात्मक अनुभवातूनही मलायकाने सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारला आहे. “गेल्या काही वर्षांत मी हे सगळं टीका म्हणून न घेता, ते एक प्रकारचं शिकवण मानलं. आता मला हे स्पष्ट समजलंय की, आपण स्वतःसाठी जे काही तयार करतो, तेच खरं आणि योग्य असतं,” असं मत ती मांडते.अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये मैत्रीचे नाते कायम असून, सध्या मलायका पूर्णपणे तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा आणि ट्रोलिंगला सामोरे जाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
 
 
बॉलिवूडमधील ग्लॅमरच्या झगमगाटामागे असलेली ही खडतर मानसिक झुंज आणि मलायकाचा सडेतोड स्वभाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतो आहे.