आज खाजगी डॉक्टरांचा बंद

    दिनांक :17-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Private doctors महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सीसीएमपी प्रमाणपत्रधारक होमिओपॅथी पदवीधरांची नोंदणी तसेच प्रॅक्टिस करण्यास मुभा देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात उद्या गुरुवारी नागपुरातील दहा हजार खाजगी बंद पाळणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेेश सावरबांधे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, सर्व खाजगी डॉक्टर्स बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवतील. गंभीर रुग्ण आला तरी त्यास शासकीय रुग्णालयात पाठवले जाईल. हा लाक्षणिक बंद आहे. मागणी मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानात लाँग मार्च, उपोषण करण्यात येईल.
 
 
Private doctors
 
Private doctors महाराष्ट्र शासनाने ११ जुलै २०२४ रोजीच्या स्वतःच्या अधिसूचनेच्या विरोधात ५ सप्टेंबर २०२५ रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला सीसीएमपी प्रमाणपत्रधारक होमिओपॅथी पदवीधरांची नोंदणी तसेच प्रॅक्टिस करण्यास मुभा दिली. शासनाने या अचानक घेतलेल्या ‘यू-टर्न’मुळे आधुनिक वैद्यकीय व्यवसायिकांना धक्का बसला असून तीव‘ नाराजी निर्माण झाली आहे. त्यातच सदर सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून अंतिम निर्णय अजून यायचाच आहे.
 
 
Private doctors होमिओपॅथी किंवा या पदवीधरांना मुळीच विरोध नाही. मात्र, होमिओपॅथी पदवीधरांना आधुनिक वैद्यकशास्त्रात प्रवेश दिल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, वैज्ञानिक वैद्यकीय व्यवसायाची हानी होईल, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या वैधानिक चौकटीचे उल्लंंघन होईल, असे सावरबांधे यांनी केले. या आंदोलनास मार्ड, महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्र गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर्स असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, एमएसआरडीए, एएमसी तसेच महाराष्ट्रातील अनेक इतर स्पेशालिटी मेडिकल असोसिएशन्स या आंदोलनामध्ये खंबीरपणे उभ्या आहेत. या सर्वांनीच मिक्सोपॅथीचा विरोध दर्शवला आहे. निवासी डॉक्टर्स काळ्या फिती लावून काम करीत आहेत. १८ सप्टेंबरला ८ ते १९ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत सर्व दवाखाने व रुग्णालये २४ तास बंद ठेवून संपामध्ये सहभागी होतील. डॉ. यशवंत देशपांडे, डॉ. जितेंद्र साहू, डॉ. आशीष दिसावल, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. बी.के. शर्मा पत्रकार परिषदेला उपस्थित होते.