फिल्म इंडस्ट्रीने ऐश्वर्याला सोडले... मग

17 Sep 2025 12:53:04
मुंबई,
Salman Khan Aishwarya Rai breakup बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या प्रेमप्रकरणांपैकी एक म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं नातं. दोघांचं नातं जरी वर्षांपूर्वी संपलं असलं, तरीही त्यांचं प्रेम आणि ब्रेकअप अजूनही चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. अलीकडेच प्रसिद्ध जाहिरात निर्माता प्रहलाद कक्कड यांनी या दोघांच्या ब्रेकअपविषयी मोकळेपणाने काही महत्वाचे खुलासे केले आहेत.
 
 
Salman Khan Aishwarya Rai breakup
 
एका मुलाखतीत प्रहलाद कक्कड यांनी सांगितलं की, ऐश्वर्या राय ब्रेकअपमुळे नव्हे तर फिल्म इंडस्ट्रीनं घेतलेल्या पक्षपाती भूमिकेमुळे अधिक दु:खी होती. त्यांनी स्पष्ट केलं की, ब्रेकअपनंतर ऐश्वर्या खूप अस्वस्थ होती कारण तिला वाटत होतं की संपूर्ण इंडस्ट्रीने सलमानचा पाठीशी देत तिला एकटी सोडली आहे.कक्कड यांच्या मते, “मी फक्त तिच्या बाजूने उभा होतो. तिला मी सांगितलं होतं की, काळजी करू नकोस. पण ती म्हणायची, ‘पण ही इंडस्ट्री...’ तिला सर्वाधिक त्रास झाला तो इंडस्ट्रीकडून मिळालेल्या बेदिलीचा. तिच्या मते, तिला या नात्यातून काहीही चूक नसतानाही दोष दिला गेला.”
 
 
 
 
बाजू घेतली नाही
ते पुढे म्हणाले की, या नात्याचा परिणाम केवळ ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यावरच नव्हे तर तिच्या व्यावसायिक कारकीर्दीवरही झाला. “ती ब्रेकअपमुळे फारशी त्रस्त नव्हती, पण तिला दु:ख होतं की इंडस्ट्रीनं तिची बाजू घेतली नाही. जर ती चुकीची असती किंवा दोघांनाही सारखं वागवलं असतं, तर हे समजून घेता आलं असतं. पण इथे पूर्णपणे एकतर्फी भूमिका घेतली गेली,” असं कक्कड यांनी स्पष्ट केलं.
 
 
सलमान खानच्या Salman Khan Aishwarya Rai breakup वागणुकीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, सलमान खूपच भावनिक आणि अनेकदा आक्रमक वागायचा. “मी त्याच्याच इमारतीत राहत होतो. त्यामुळे मी स्वतः पाहिलं की तो फोयरमध्ये तमाशा करायचा, भिंतीवर डोकं आपटायचा. खरंतर हे नातं अधिकृतरीत्या संपण्याआधीच तुटलं होतं. आणि जेव्हा ते शेवटी संपलं, तेव्हा ती केवळ ऐश्वर्यासाठी नव्हे तर तिच्या पालकांसाठी, तिच्या मित्रमंडळींसाठी आणि अगदी संपूर्ण विश्वासाठी एक प्रकारची सुटकेची भावना होती,” असंही त्यांनी नमूद केलं.सलमान आणि ऐश्वर्याचं नातं १९९९ साली ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सुरू झालं होतं आणि काही वर्षांतच त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर दोघांनीही आपापल्या आयुष्यात पुढे पाऊल टाकलं, मात्र या नात्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात जिवंत आहेत. प्रहलाद कक्कड यांचे हे वक्तव्य पुन्हा एकदा या प्रकरणाला नव्या चर्चेचं केंद्र बनवू शकतं.
Powered By Sangraha 9.0