स्कूलबस-व्हॅन अपघातानंतर उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

    दिनांक :17-Sep-2025
Total Views |
- विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांकडून मागवले उत्तर

अनिल कांबळे
नागपूर,
आठ वर्षीय विद्याथ्नििीचा स्कूल बसखाली येऊन मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारले. 2021 साली घडलेल्या या घटनेनंतर ही याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असून, न्यायालय मित्र अ‍ॅड.फिरदाैस मिर्झा यांनी अतिरिक्त अर्जाद्वारे Schoolbus-van fitness स्कूल बसच्या फिटटनेस तपासणीसह चालक व वाहकांच्या पार्श्वभूमीची पडताळणी करण्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अर्ज रेकाॅर्डवर ठेवत न्यायालयाने विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना यासंदर्भात दाेन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
 
 
Schoolbus
Schoolbus-van fitness  न्या. अनिल किलाेर आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमाेर झालेल्या सुनावणीदरम्यान अ‍ॅड.फिरदाैस मिर्झा यांनी 12 सप्टेंबर राेजी मानकापूर उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघाताची माहिती दिली. या अपघातात स्कूलबस व स्कूलव्हॅनची टक्कर हाेऊन व्हॅनचालक आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर शाळांच्या स्कूल बसच्या फिटनेस तपासणीचा मुद्दा चव्हाट्यावर आला. आजही अनेक शाळांनी बसचे फिटनेस प्रमाणपत्र अद्याप तपासलेले नसल्याचा दावा अ‍ॅड. मिर्झा यांनी न्यायालयात केला.
 
अनेक स्कूलबस फिटनेस विना
यापूर्वी 1 जुलै 2025 राेजी दाखल केलेल्या न्यायालयाच्या नाेंदीत नागपूर शहरातील अनेक शालेय Schoolbus-van fitness  बस व व्हॅन फिटनेस प्रमाणपत्रांशिवाय रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आणले हाेते. जिल्हास्तर व शाळास्तर समित्यांच्या बैठकींची माहिती सादर करण्याची मागणीही न्यायालयास करण्यात आली हाेती. अपघाताच्या संदर्भात अ‍ॅड. मिर्झा यांनी न्यायालयास विनंती केली आहे की, किती शाळांनी चालकांच्या रेकाॅर्ड तपसला आहे आणि व इतर सुरक्षा नियमांचे पालन केले आहे का, याची चाैकशी करण्यात यावी.