रेफोरपॅक २०२५ : भव्य युद्ध सराव

17 Sep 2025 19:16:05
विश्वसंचार...
मल्हार कृष्ण गोखले
War training अमेरिकन लोकांना कोणत्याही गोष्टीला लांबलचक ठेवण्याची आणि मग त्याचे लघुरूप (शॉर्टफॉर्म) करून वापरण्याची भयंकर हौस आहे. ‘रेझोल्यूट फोर्स पॅसिफिक’ या नावाचे लघुरूप म्हणजे ‘रेफोरपॅक.’ अत्यंत भव्य असा हा हवाई युद्ध सराव १० जुलै ते ८ ऑगस्ट २०२५ असा चांगला महिनाभर चालू होता. पॅसिफिक उर्फ प्रशांत महासागराच्या ३ हजार सागरी मैल एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रातील ५० ठिकाणे, ४०० हून अधिक विमाने आणि १२ हजारांपेक्षा अधिक माणसे यात सामील होती. अमेरिकन सेना दलाचे ‘इंडो-पॅसिफिक कमांड’ या नावाचे स्वतंत्र सैनिकी अधिकार क्षेत्र आहे. अमेरिका खंडाच्या पश्चिम तटावर पॅसिफिक महासागर सुरू होतो. तिथपासून भारताच्या पूर्व किनार्‍यापर्यंत ही इंडो-पॅसिफिक कमांड पसरलेली आहे. हे क्षेत्र साधारण १० कोटी चौरस मैल २६ कोटी चौरस कि.मी. एवढे आहे. म्हणजे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५२ टक्के एवढा भाग यात येतो. अमेरिकन नौदलाचा अ‍ॅडमिरल सॅम्युएल पापेरो हा या अवाढव्य कमांडचा प्रमुख सेनापती असून त्याच्या हाताखाली ३ लाख ७५ हजार माणसे कार्यरत आहेत. यात अमेरिकन भूदल, वायुदल, नौदल आणि मरिन्स अशा सर्व सैनिकी सेवांची पथके तसेच जपान आणि दक्षिण कोरिया या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांची पथकेही आहेत.
 
 
reforpac
 
या कमांडचे मुख्यालय हवाई बेटांवर आहे. आपल्याला हवाई म्हटल्यावर हवाई दल म्हणजे विमानदल किंवा वायुदल आठवते. तो अर्थ इथे लागू नाही. पृथ्वीवरच्या पाच महासागरांपैकी पॅसिफिक हा सर्वात विस्तीर्ण महासागर आहे. War training  त्याच्यात अमेरिका आणि आशिया-ऑस्ट्रेलिया खंडांच्या दरम्यान अक्षरशः हजारो किंवा द्वीपसमूह आहेत. त्यांना मेलनोशियन द्वीपसमूह, मायक्रोनेशियन द्वीपसमूह, पॉलिनेशियन द्वीपसमूह अशी नावे आहेत. यापैकी पॉलिनेशियन समूहात हवाई बेट आहे. हा सुद्धा १० मोठ्या आणि १०० छोट्या बेटांचा एक समूहच आहे. त्यापैकी हवाई हे सर्वात मोठे बेट असल्यामुळे त्यांना हवाई बेट या साधारण नावाने ओळखले जाते. इंडो-पॅसिफिक कमांड क्षेत्राच्या या तुमच्या लक्षात आलेच असेल की, सैनिकी डावपेचांच्या दृष्टीने या क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या तीनही जागतिक महासत्तांसाठी हा फारच महत्त्वाचा सैनिकी आखाडा आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी ही अणुशक्तिसंपन्न युरोपीय राष्ट्रे या आखाड्यापासून दूर आहेत.
 
 
 
War training  जपान हा देश आज अमेरिकेचा मित्र आहे. पण दुसर्‍या महायुद्धात जपानने संपूर्ण क्षेत्र आपल्या ताब्यात आणून अमेरिकेच्या नाविक प्रभुत्वाला फारच मोठे आव्हान दिले होते. त्यामुळे आधुनिक आरमारी युद्धांमधल्या फार मोठ्या लढाया याच क्षेत्रात झाल्या होत्या. आपण ही गोष्ट नक्कीच ऐकली-वाचली असेल की, जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक अड्ड्यावर आकस्मिक झंझावाती हवाई हल्ला करून फार विध्वंस केला. त्यामुळे अमेरिका महायुद्धात इत्यादी. तर हा पर्ल हार्बर नाविक तळ अमेरिकेच्या मुख्य भूमीवर नसून या हवाई बेटांवरच आहे. ही बेटे अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून किमान ३ हजार कि.मी. दूर आहेत. ‘गुडाल कॅनॉलची लढाई’, ‘फिलिपाईन्स समुद्राची लढाई’, ‘कॉरल समुद्राची लढाई’, ‘लियेत आखाताची लढाई’ आणि ‘मिड-वे ची लढाई’ अशा अत्यंत हिंस्र, भयंकर कचाकचीच्या सागरी लढायांनी ते १९४४ या काळात पॅसिफिक महासागराचा हा आखाडा नुसता दुमदुमत होता. महायुद्धाची अखेर ज्या अणुबॉम्बनी घडवून आणली, ते अणुबॉम्ब या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातल्या टिनियन नावाच्या बेटावर अमेरिकन बी-२९ जातीच्या बॉम्बर विमानांमध्ये चढवण्यात आले. त्यांनी जपानची हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे जमीनदोस्त केली आणि महायुद्ध संपवले. त्यानंतर लगेचच म्हणजे १९४७ साली ‘इंडो-पॅसिफिक कमांड’ हा विशेष सेना विभाग निर्माण केला. महायुद्धाच्या वेळेस शत्रू असलेला जपान आज अमेरिकेचा मित्र आहे. त्यावेळी मित्र असलेला रशिया आज कुंपणावर आहे. म्हणजे धड मित्रही नाही, धड शत्रूही नाही. त्यावेळी खिजगणतीत नसलेला कोरिया देश आज विभाजित झाला आहे. पैकी दक्षिण कोरिया मित्र आहे, तर उत्तर कोरिया हा चक्रम, अण्वस्त्रसज्ज असा शत्रू आहे. त्यावेळी आश्रित असलेला चीन हा संभाव्य मोठा शत्रू आहे.
 
 
War training आज चीनला सर्वप्रथम पॅसिफिकमधला कोणता भाग हडप करायचा असेल तर तो म्हणजे तैवान हा देश. खरे म्हणजे ते सुमारे ३६ हजार चौरस कि.मी. क्षेत्रफळाचे एक बेटच आहे. त्याचे मूळ नाव फोर्मोसा बेट. १९४९ साली चीनमध्ये साम्यवादी क्रांती घडवून जनरल चँग कै शेक याच्या नेतृत्वाखालचे लोकशाही सरकार उलथवले. तेव्हा चँग कै शेक चीनच्या मुख्य भूमीपासून १८० कि.मी. दूर असलेल्या या फोर्मोसो बेटावर आला आणि अमेरिका व अन्य नाटो करार राष्ट्रांच्या पाठिंब्यावर त्याने फोर्मोसा किंवा तैवान हे लोकशाही चिनी सार्वभौम राष्ट्र असल्याची घोषणा केली. आपल्या दृष्टीने बेटाला वेगळे भावनिक महत्त्व आहे. १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस हे एका विमान अपघातात ठार झाल्याची बातमी देण्यात आली होती. हा कथित विमान अपघात फोर्मोसा बेटावर झाला होता.
 
 
असो, तर तैवानचा हा लोकशाही सार्वभौमपणा चीनच्या डोळ्यांत काट्यासारखा सलतो आहे. आजच्या घटकेला असे सांगितले जाते की, साली प्रचंड नाविक चढाई करून तैवानचा घास घेण्याची चीनची तयारी सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी नौदल सेनापतींना तशा सख्त सूचना दिलेला आहेत. नंतर क्रमाक्रमाने चीन, दक्षिण कोरिया, जपानपासून फिलिपाईन्सपर्यंतच्या देशांचा समाचार घेईल. त्यानंतर टिनियन बेटे ते ग्वाम बेटे ही बेटांची साखळी आणि नंतर हवाई बेटे असा चीनचा असणार आहे. War training महायुद्ध काळात आणि नंतरच्या शीतयुद्ध काळात अमेरिकेच्या अनेक विमानवाहू नौकांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मोठाच धाक पसरवून ठेवला होता. तुम्हाला आठवत असेल तर १९७१ च्या भारत-पाक युद्धात अमेरिकेची ‘एंटरप्राईस’ ही आण्विक विमानवाहू नौका भारतीय नौसेनेवर दबाव आणण्यासाठी १५ डिसेंबर १९७१ रोजी पॅसिफिकमधून बंगालच्या उपसागरात आली होती. आपल्या सेनापतींनी अतिशय १६ डिसेंबर रोजी पाकिस्तानची शरणागती घेतल्यामुळे अमेरिकन युद्धनौकेला काही कामच राहिले नाही. असो.
 
 
पण आता चीन अशा एक अनेक युद्धनौकांना घाबरत नाही. कारण त्याच्याकडे ‘डी.एफ. २६ बी’ ही क्षेपणास्त्रे आहेत. या क्षेपणास्त्रांचा पल्ला २ हजार सागरी मैलांचा असून त्यांना ‘एअरक्राफ्ट कॅरियर किलर’ म्हणूनच ओळखले जाते. अमेरिकन War training युद्धशास्त्र अभ्यासकांच्या दृष्टीने घटकेला चीन जेव्हा तैवानवर झडप घालेल तेव्हा तो ओकिनावा, तैवान ते मलेशिया या सलग बेट साखळीवर एका दिवसाला २ हजार बॉम्ब किंवा क्षेपणास्त्रे वर्षावू शकेल. जपानच्या मुख्य भूमीजवळ ओकिनावा येथे अमेरिकेचा मोठा सैनिकी तळ आहे. त्यानंतर टिनियन बेटे ते ग्वाम बेटे या दुसर्‍या बेट साखळीवर तो दिवसाला ४५० बॉम्ब क्षेपणास्त्रे फेकू शकतो. त्यानंतर हवाई बेटे आणि सर्वात शेवटी अमेरिकन मुख्य भूमीचा अलास्का प्रांतातील तळ अशी त्याची लक्ष्य असू शकतात.
 
 
या सगळ्या संभाव्य शक्यता लक्षात घेऊन अमेरिकन सेनापतींनी ‘रेफोरपॅक-२५’ या War training  युद्ध सरावाची मांडणी केली होती. चीनच्या विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अमेरिकन सेनादलांची विमाने वेगवेगळ्या ठिकाणी विखरून राहतील. कामगिरीवर निघाली की ती भुंग्यांप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणांहून आकाशातच एकत्र होतील. हल्ला चढवतील किंवा आलेल्या हल्ल्याचा सामना करतील. काम पूर्ण झाले की, पूर्ववत विखरून वेगवेगळ्या तळांवर परततील. असे धोरण आखण्याचे मुख्य कारण म्हणजे हे युद्धक्षेत्र चीनच्या अगदी अंगणा-परसातच आहे. तर अमेरिकेला मुख्य भूमीपासून खूप दूर सगळे युद्धसाहित्य विमाने, युद्धनौका, शस्त्रास्त्रे, दारूगोळा, अन्नधान्य आणि पेट्रोल सगळेच आले. या वस्तू वाढून आणाव्या लागतात तर अशा प्रकारे युद्ध आखाडा सजतो आहे.
 
(लेखक प्रसिद्ध स्तंभलेखक आहेत.)
७२०८५५५४५८
Powered By Sangraha 9.0