विदर्भाच्या पर्यटन विकासाची हमी

    दिनांक :18-Sep-2025
Total Views |
वेध...
 हेमंत सालोडकर
 
tourism-development महायुती सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात विकासाचा धडाका लावला. यापूर्वी 2014 मध्ये त्यांनी अनेक विकासाची आणि लोककल्याणकारी योजना राबवायला सुरुवात केली. त्याचा फायदा समाजातील अनेक गरजूंना झाला. राज्याच्या प्रमुखाला विकासकामे आणि लोककल्याणकारी योजना राबवितानाच इतरही अनेक गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. राज्याचा महसूल कसा आणि कोणत्या विकासकामांतून वाढेल याचे ज्ञान असणे आवश्यक असते. यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम झपाट्याने सुरू आहे. त्यांच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी राज्यासह नागपूरसह विदर्भाचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याचे मोठे उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर चारचाकीने कमी वेळात सहज गाठता येते. त्यापाठोपाठ नागपूर आणि विदर्भात येणारे विविध प्रकल्प, आतापर्यंत विदर्भाचा शेवटचा जिल्हा म्हणून ज्याचा उल्लेख व्हायचा तो गडचिरोली जिल्हा स्टील हब करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. विदर्भात मोठे उद्योग आणण्यासाठी त्यांनी मोठ्या कंपन्यांसोबत केलेले करार पाहता विदर्भाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक धडपड दिसून येते.
 
 

paryavarn 
 
 
राज्यासह विदर्भाचा आणि नागपूरच्या आसपासच्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला आहे. तसे वचन त्यांनी नागरिकांना दिले होते आणि ते पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादृष्टीने नागपूरला पर्यटन हब करण्याचा त्यांचा संकल्प सर्वश्रुत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरच्या कोराडी येथे जागतिक दर्जाच्या इको-टुरिझम प्रकल्पाला गती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोराडी येथील अंबादेवी देवस्थान हे महाराष्ट्र आणि लगतच्या राज्याच्या भाविकांचे श्रद्धेचे ठिकाण आहे. काही वर्षांपूर्वी या देवस्थानाची स्थिती फारशी चांगली नव्हती. पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिसराचा चेहरामोहरा बदलवून टाकला. त्यामुळे येथे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या सोई पुरविण्यात आल्या. भाविकांसाठी अत्यल्प किमतीत भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या मंदिराचे सध्याचे भव्य दिव्य रूप आणि तेथील दगडांवरील रेखीव काम येणाèयाच्या डोळ्यात भरते. हा लौकिक कायम ठेवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोराडीसह विदर्भातील अन्य प्रमुख ठिकाणांना पर्यटन हब बनविण्यासाठी ते तत्पर आहेत. कोराडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत नुकताच मुंबई येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. (महाजेनको) यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारानुसार आता 232.64 हे. आर. जमिनीचे 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर एनएमआरडीएकडे हस्तांतरण होणार असून, वार्षिक भाडे 1 रुपये राहणार आहे.tourism-development वाढीव मुदतीचा पर्याय उपलब्ध असणार आहे. महाजेनको कंपनीने भाडे कराराने दिलेली जागा कोराडी, महादुला, खापरखेडा, नांदा (ता. कामठी) आणि घोगली ता. नागपूर (ग्रामीण) या भागात व्यापलेली आहे.
या प्रकल्पांतर्गत नैसर्गिक संसाधनांच्या सान्निध्यात जागतिक दर्जाचे निसर्ग पर्यटन स्थळ उभारले जाणार आहे. नॉन-मोटरायईड बोटिंग, पर्यावरणपूरक शिकारा राईड्स, फ्लोटिंग डेक्स, पक्षी निरीक्षण व निसर्ग पर्यटन यासारखे उपक्रम यात असतील. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पर्यटनाला चालना मिळेल आणि परिसराचा सामाजिक-आर्थिक विकास होईल. हे सर्व करताना पर्यावरण संरक्षण नियमांचे काटेकोर पालन होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे. कारण पर्यटन हब उभारायचे म्हणजे पर्यावरणाला धोका पोहोचू शकतो. तो कसा टाळता येईल यावर उपाय केले पाहिजेत. या पर्यटन करारामुळे कोराडी परिसराला निसर्ग पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
आता कोराडीचा पर्यटन स्थळ म्हणू विकास होत असता विदर्भातील पेंच अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, मेळघाट अभयारण्य, थंड हवेचे ठिकाण असलेले चिखलदरा, तोतलाडोह पर्यटनस्थळ, अकोला किल्ला, गाविलगड किल्ला, पवनीचा किल्ला, सानगडीचा किल्ला, नागपूरचा सीताबर्डी किल्ला, गोंदियाचा प्रतापगड, रामटेक येथील गडमंदिर आणि विदर्भातील अष्टविनायक यांचा विकास होणेही अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास आहे.
 
9850753281