‘उदे ग अंबे उदे..!’

जिल्ह्यात आज होणार माँ दुर्गेची स्थापना

    दिनांक :21-Sep-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal Navratri जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा 3 हजार 200 दुर्गा उत्सव मंडळांकडून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनीही तयारी केली असून, चोख बंदोबस्त राहणार आहे.
 

Yavatmal Navratri 2025, Durga idol installation 
यवतमाळ शहरात सर्वाधिक 170 दुर्गोत्सव मंडळांकडून देवीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण शहर सजले असून, मंडळांनी आकर्षक देखावे उभारले आहेत. दुर्गादेवीसोबतच शारदादेवीचीही प्रतिष्ठापना केली जाते. 25 शारदा उत्सव मंडळांनी तयारी केली आहे. सोमवार, 22 सप्टेंबर ते शनिवार, 4 ऑक्टोबर या कालावधीत दुर्गादेवीची आराधना केली जाणार आहे.
जिल्ह्याच्या शहरी भागात 800 तर ग्रामीण भागात 2 हजार 400 देवी मंडळे यंदा आहेत. तर 614 शारदा देवी उत्सव मंडळे असून, 134 मंडळे शहरी भागात आणि 480 मंडळे ग्रामीण भागात आहेत.