जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्तीची नामुष्की टळली

24 Sep 2025 16:36:27
वर्धा, 
district collectors office रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला वेळीच देण्यात न आल्याने जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशान्वये आज मंगळवार २३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर साहित्य जप्तीची कारवाई होणार होती. मात्र, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्या दालनात दीड तास झालेल्या चर्चेअंती शेतकर्‍याला लेखी आश्वासन देण्यात आल्याने जप्तीची नामुष्की टळली.
 

fdgfdg 
 
 
पूर्वीचा वर्धा दक्षिण वळण मार्ग तर आताचा राज्य महामार्ग ३३१ या चौपदरी रस्त्याकरिता शेतकर्‍यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले. संबंधित महामार्ग परिसरातील उच्च विद्युत वाहिनी कायम असल्याने तो अजूनही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. पण याच महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला शेतकर्‍यास देण्यात न आल्याने शेतकर्‍याने जिल्हा सत्र न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय देत जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने साहित्य जप्तीचे आदेश निर्गमित केले.district collectors office हा आदेश घेत न्यायालयीन अधिकारी मंगळवार २३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभागाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आल्याने आणि ते शेतकर्‍यानेही मान्य केल्याने अखेर जप्तीची नामुष्की टळली.
नेमके प्रकरण काय?
शहराशेजारील दत्तपूर चौक ते सेवाग्राम मार्गावरील इंदिरा गांधी उड्डाण पूल चौक या वर्धा दक्षिण वळण मार्गासाठी सन २०२२ मध्ये स्नेहलनगर भागातील रहिवासी कमलाकर उमाटे व सुधाकर उमाटे यांची २२ आर. जमीन जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाच्या देखरेखीत अधिग्रहित करण्यात आली होती. सुरूवातीला त्यांना ५५ हजार रुपये इतका मोबदला देण्यात आला. पण हा मोबदला अल्प असल्याने त्यांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयाची पायरी चढली. न्यायालयाने शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय देत वाढीव मोबदला देण्याचा आदेश निर्गमित केला. पण वाढीव मोबदला देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने पुन्हा एकदा शेतकर्‍याने न्यायालयाचे दार ठोठावले. याच याचिकेवर सुनावणी घेत जिल्हा सत्र न्यायालयाने जप्तीचे आदेश निर्गमित केले.
Powered By Sangraha 9.0