शहरातील घाणीचे साम्राज फुटलेले रोड, नाल्यांची साफसफाई करा

24 Sep 2025 19:46:37
बुलढाणा,
pipeline repair गेल्या दीड वर्षापूर्वी बुलडाणा नगर पालिकेने जल जीवन मिशन अंतर्गत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने एका संस्थेला शहरातील जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकून नागरिकांचे नळ कनेशन जोडण्याचे काम दिले होते. परंतु शहरात संस्थेने नवीन पाईपलाईन टाकतांना सदर रस्त्याची फोड तोड केली होती. त्यामुळे रहदारीसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अद्यापर्यंत शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामे संस्थेने केले नाही. आणि आता यावर्षीच्या झालेल्या मोठ्या प्रमाणावर पावसामुळे सदर रस्त्याचे नुकसान झालेले आहे. रस्त्यावरील पुलाचे देखील तोडफोड झालेली आहे. सदर पाईपलाईन टाकणार्‍या संस्थेकडून शहरातील रस्त्याचे काम करण्याचे आदेश व्हावे. अशी मागणी मुख्याधिकारी गणेश पांडे यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
 

 Buldhana road damage, pipeline repair demand, 
गेल्या अनेक महिन्यांपासून बुलडाणा शहरातील प्रत्येक प्रभागा मधील घाणीच्या साम्राजाचा अगदी कहर झालेला आहे. काही महिन्यापूर्वी बुलडाणा शहरातील साफसफाईचा ठेका कुमोदिनी रिसोरशेस् मॅनेजमेंट लिमिटेड वाशिम या संस्थेला करार करुन जवळपास २३ ते २६ लाख रुपये प्रति महिन्या प्रमाणे दिलेला आहे. बुलडाणा नगर पालिकेचे सफाई कामगार देखील काम करीत आहेत. या ठेयामध्ये नगर पालिकेचे साफसफाई कामगार काम करीत असतील तर त्यांचा पगार देखील संस्थेने द्यायला पाहिजे. मात्र तसे होत नाही. ठेका संस्थेला दिला संस्था महिन्यापोटी २३ ते २६ लाखापर्यंतचे बिल टाकुन नगर पालिकेच्या आर्थिक बाबतीत एक प्रकारे आर्थिक नुकसान करीत आहे. शहरवासीयांच्या वसूल होणार्‍या करामधून जमा होणारा सर्व पैसा ठेकेदारा दिल्या जात आहे. निवेदन दिल्यापासून ७ दिवसात वरिल दोन्ही मुद्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने नगरपालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करु त्यावेळी होणार्‍या नुकसानीची संपूर्ण जबाब नगर पालिका प्रशासनाची राहील याची नोंद घेण्यात यावी असे निवेदनाद्वारे काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकास, जाकीर कुरेशी, अमीन भाई, बबलु कुरेशी, गजानन शेळके यांनी नमुद केले आहे
Powered By Sangraha 9.0