आ. वानखेडेंच्या प्रयत्नाने मिळाली थकित रकम

24 Sep 2025 16:58:27
आर्वी,
mla wankhede जिल्हा सहकारी बँकेतील सेवानिवृत्त आणि ऐच्छिक सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली त्यांची वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्याची थकबाकी त्यांना मिळाली आहे. निवृत्त कर्मचार्‍यांचा प्रश्न तडीस लावण्याचे काम आ. सुमित वानखेडे यांनी केल्याबद्दल सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी आ. सुमित वानखेडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
 
 

वानखेडे  
 
 
एप्रिल २०१५ पासून बँकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्ता रोखून धरण्यात आला होता. यात वार्षिक वेतनवाढीचे १३० लाख, महागाई भत्याचे ११८ लाख, भविष्य निर्वाह निधीचे २९ लाख, ग्रॅच्युइटी फरकाचे १४१ लाख आणि सुट्ट्यांच्या पगाराचे ३२ लाख रुपये अशी ४५० लाख रुपयांची रक्कम थकित होती. सेवानिवृत्त आणि ऐच्छिक सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना डावलण्यात आले होते.mla wankhede याबाबत, कर्मचार्‍यांनी आ. वानखेडे यांच्याकडे न्याय मागितला. त्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून पाठपुरावा केला आणि अखेर कर्मचार्‍यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे, थकीत रक्कम कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा झाली. त्याबद्दल आर्वी, आष्टी आणि कारंजा येथील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी आ. वानखेडे यांचे आभार मानले.
Powered By Sangraha 9.0