हनुमानने फिरवला ११२; पोलिसांनी दाखवला इंगा

24 Sep 2025 20:16:55
सिंदी (रेल्वे), 
Dahegaon Police : दारूच्या नशेत कोपरा (चाणकी) येथील हनुमान धुर्वे याने दहेगाव पोलिसांना बसस्थानक परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती ११२ क्रमांकावर दिली. ती खबर खोटी असल्याचे लक्षात येताच ठाणेदार मदान यांनी हनुमानला अटक करुन ‘प्रसाद’ दिला.
 
 
JLKJ
 
 
दहेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी हनुमान धुर्वे (२८) याने दारूच्या नशेत बसस्थानक परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती दिली. माहितीच्या आधारे ठाणेदार प्रल्हाद मदान यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. चौकशी करताना हनुमानाचा मोबाइल बंद आढळला. मदान यांनी हनुमानच्या घरी जाऊन चौकशी केली असता सहजच फोन केला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यास अटक केली आणि ठाण्यात आणून प्रसाद दिला.
Powered By Sangraha 9.0