भाजपा महिला व महिला सक्षमीकरण केंद्राचे आयोजन
यवतमाळ,
Garba Dhamaal Dandiya Night माजी राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान आणि जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात गरबा धमाल दांडिया नाईटचे आयोजन गुरुवार, २५ तारखेला कोल्हे सभागृह येथे संध्याकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मिर्झापुरे यांनी गरबा प्रशिक्षण कार्यशाळेचे सहा दिवस आयोजन केले. यात महिलांना गरबा प्रशिक्षण निशुल्क देण्यात आले. वेगवेगळ्या केंद्रांवर हे प्रशिक्षण सुरू होते.
यवतमाळच्या सरिता बाजन्नलावर, मुंबईच्या पल्लवी ढोणे, अकोल्याचे अजय सहारे या तिघांनी महिलांना गरबा प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणानंतर आता गुरुवारी Garba Dhamaal Dandiya Night गरबा धमाल दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. दोन सोन्याच्या नथ, पाच चांदीच्या नथ, २१ पैठणी, ३ अमेरिकन डायमंड सेट, पारंपरिक ज्वेलरी सेट, कॉस्मेटिक किट, अशा अनेक प्रकारची १०० च्या वर बक्षिसे देण्यात येत आहेत. सोबतच सन्मानचिन्ह आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र आणि प्रत्येकाला गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. हे भव्य आयोजन भाजपा महिला मोर्चा, तसेच भाजपा महिला केंद्राच्या वतीने करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक‘माचा आनंद घ्यावा, असे आवाहन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापुरे यांनी केले आहे.