अपूर्ण घरकुल लवकर पूर्ण करा

24 Sep 2025 19:21:06
संतोष धोत्रे :  शिवणी ग्रामपंचायतीत गृहप्रवेश

यवतमाळ : 
ज्या लाभार्थ्यांचे Gharkul scheme घरकूल पूर्ण नाही, त्यांनी तत्काळ पूर्ण करावे, अशा सूचना यवतमाळ जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिल्या. ते ग्रामपंचायत शिवणी येथे घरकुल गृहप्रवेश सोहळ्यादरम्यान बोलत होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत शिवणी बु, विठ्ठलवाडी, मनपूर व खरद पंचायत समिती यवतमाळ येथे संतोष धोत्रे भेट दिली. त्यांनी ग्रामपंचायत शिवणी, विठ्ठलवाडी व खरद येथील ग्रामसभेला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
 
 
Gharkul
 
तसेच योजनेची माहिती दिली व या योजनेत समाविष्ट होण्याबाबत ग्रामसभेला आवाहन केले. तसेच या गावातील प्रधानमंत्री आवास योजनेतील पूर्ण झालेल्या घरकुलांचे गृहप्रवेश व अपूर्ण घरकुल लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत लाभार्थ्यांना सूचना व दिले. त्याच बरोबर नवीन Gharkul scheme घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. या भेटीदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विस्तार अधिकारी अनिल जगताप, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0