जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा

24 Sep 2025 19:48:43
बुलढाणा,
International Ayurveda Day येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी १० वा आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उदघाटन आर्युवेद देवतेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजित मंडाले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे आदी उपस्थित होते.
 

International Ayurveda Day Buldhana 
या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, आयुष विभागातील तज्ञ, परिचारिका प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक(आयुष) डॉ. शफात, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कमर खान, होमिओपॅथी तज्ञ स्वाती लोखंडे धारस्कर, युनानी तज्ञ डॉ. अर्षद सय्यद, औ. नि. अ. आयुष रेखा शिंदे, शांता अंभोरे, सौरभ कुलकर्णी तसेच अन्य आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंकज राठोड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शीतल ठाकरे यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0